Manoj Jarange in Tramakeshwar Sarkarnaa
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : त्र्यंबकेश्वर पुरोहितांच्या नामावळीतील नोंदी विश्वासार्ह; जरांगे पाटलांनीच दिला पुरावा

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवस्थानातील पुरोहितांच्या नामावळीतील नोंदीमध्ये मराठा कुणबी उल्लेख आढळून आला आहे. या नामावळीतील नोंदी विश्वासार्ह असून शासनाने त्यांचा पुरावा म्हणून वापर करावा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केले आहे.

देशाच्या कानकोपऱ्यातून यात्रेकरू त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येतात. येथे आल्यावर पुरोहितांकडून पूजापाठ केली जाते. त्यावेळी पुरोहित आलेल्या भाविकांच्या नोंदी करून ठेवताना जातीचा उल्लेख करण्यात येत असे, अशा हजारो नोंदी आजही उपलब्ध आहेत. त्यात मराठा, कुणबी नोंदी देखील आढळल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील तीनशे पुरोहिंताकडे या नोंदी उपलब्ध आहेत. देवस्थानच्या कोठी हाॅलमध्ये व लगत बावीस खोल्यांमध्ये या नामावळी ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक (Manoj Jarange) मनोज जरांगेंनी मंगळवारी बारा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचे घेतले. दर्शनानंतर जरांगे यांनी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष व विश्वस्त मनोज थेटे व पुरुषोत्तम कडलग यांची भेट घेतली. या भेटीत या नोंदीबाबत जरांगे यांना माहिती देण्यात आली.

या नोंदी म्हणजे पिढ्यानपिढ्या जतन केलेले दस्तऐवज असून शासनाने पुरोहितांच्या नामावळी कुणबी पुरावा म्हणून घ्याव्यात. यासाठी शासनास विनंती करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. या प्रसंगी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, गिरीश जोशी , विलास पांगारकर, सुरेश गंगापुत्र, नवनाथ कोठुळे, योगेश तुंगार, प्रशांत तुंगार,मुळाणे उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT