Food adulteration crackdown sinnar: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्यभर चर्चा आहे. मात्र सिन्नरमध्ये या विभागाने चक्क भेसळ करणाऱ्यांनाच पाठीशी घातले. थेट जनता दरबारातच त्याचा पंचनामा झाला.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्यभर वाहवा केली जाते. नाशिकमध्ये मात्र धक्कादायक चित्र पुढे आले आहे. यामध्ये प्रशासनातील अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सिन्नर येथील चार दूध संकलन केंद्रांवर एफ डी ए विभागाने छापे घातले होते. त्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध आढळले. 18 लाखांचे भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाऊसाहेब बैरागी यांनी त्याची पोलखोल केली. ही कारवाई करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकशोध मास्टरमाइंड असलेला आरोपीच फिरत होता, असा आरोप झाला.
त्यामुळे अद्यापही या प्रकरणात कोणालाही पोलिसांची अटक झाली नाही. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नुकताच जनता दरबार झाला. त्यात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीतच बैरागी यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले. भेसळ करणाऱ्यांना या विभागाचे संरक्षण असल्याचा आरोप झाला.
या आरोपामुळे जनता दरबारात एकच खळबळ उडाली. प्रशासनाला खुलासा करताना दमछाक झाली. पोलिसांनीही या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे बोट दाखवले. त्यामुळे या विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यानंतर दोनच दिवसांनी दातली येथे दूध संकलन केंद्रावर 200 लिटर भेसळयुक्त दूध जप्त झाले. त्यातून भेसळ करणाऱ्यांवर या विभागाचा वरदहस्त असल्याचा आरोपाला बळकटी मिळाली. दूध भेसळीला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिन्नरमध्ये दूध भेसळ प्रकरणावरून FDA विभागावर गंभीर आरोप; माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जनता दरबारात कारभारावर सवाल.
18 लाखांचे भेसळीचे साहित्य जप्त झाल्यानंतरही मुख्य आरोपींवर कारवाई न झाल्याने भेसळखोरांना प्रशासनाचे संरक्षण असल्याचा आरोप.
दोन दिवसांत पुन्हा 200 लिटर भेसळयुक्त दूध जप्त; दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.