DA Hike: सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये 5% वाढ; ओडिशा सरकारचा मोठा निर्णय

Odisha Govt Hikes DA by 5% for Employees and Pensioners: ओडिशा सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता व महागाई सवलतीत ५% वाढ केली. नवीन DA, थकबाकी आणि लाभार्थ्यांची माहिती जाणून घ्या.
Odisha Govt Hikes DA by 5% for Employees and Pensioners
Odisha Govt Hikes DA by 5% for Employees and PensionersSarkarnama
Published on
Updated on

Odisha Government News : केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात (DA) वाढ कधी होणार याची वाट पाहिली जात असतानाच, ओडिशा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठे गिफ्ट दिले आहे.

ओडिशा सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) यामध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.ही वाढ 'ओडिशा सुधारित वेतनश्रेणी (ORSP) नियम, २००८ (सुधारणेपूर्वीचे नियम) अंतर्गत करण्यात आली आहे.

कोणाला होणार फायदा?

सरकारच्या या निर्णयामुळे केवळ थेट सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर खालील घटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे:

* सरकारी अनुदानित शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

* दुय्यम न्यायालयांतील न्यायालयीन अधिकारी (Judicial Officers)

* वर्क-चार्ज्ड (Work-charged) कर्मचारी

* कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी

Odisha Govt Hikes DA by 5% for Employees and Pensioners
Shalarth Scam: शिक्षण क्षेत्र हादरलं! माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक! सरकारला 160 कोटींचा चुना; SIT च्या रडारवर 1200 जण

आता महागाई भत्ता किती मिळणार?

ओडिशा सरकारच्या वित्त विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, नवीन दर १ जानेवारी २०२६ पासून सुधारित महागाई भत्ता मूळ वेतन (Basic) आणि ग्रेड पे च्या २५७ टक्क्यांवरुन वाढवून २६२% करण्यात आला आहे. थकित रक्कम (Arrears): जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना रोखीने दिली जाईल.

जुलैचा पगार जुलै महिन्याच्या पगारात या वाढीचे समायोजन (Adjustment) केले जाणार आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यातील वाढीला अनुसरूनच करण्यात आली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यास सुरुवात केली आहे:

Odisha Govt Hikes DA by 5% for Employees and Pensioners
Bombay High Court: आईच्या जात प्रमाणपत्रावर मुलीला RTE प्रवेश; मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला दिला दणका

पश्चिम बंगाल गेल्या महिन्यात महागाई भत्त्यात २०% वाढ करून तो ३८% केला. महाराष्ट्रात नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ साठी ५ व्या, ६ व्या आणि ७ व्या वेतन आयोगानुसार तब्बल ८०० कोटी रुपयांच्या DA थकबाकीच्या वाटपास मंजुरी दिली आहे. निवृत्त 'ऑल इंडिया सर्व्हिसेस' अधिकाऱ्यांसाठी २% DR वाढ जाहीर केली आहे.

इतर राज्ये: अरुणाचल प्रदेश, आसाम, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारनेही वेगवेगळ्या वेतन आयोगांनुसार महागाई भत्त्यात वाढ केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारही लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या महागाई भत्त्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com