Nashik News, 17 Apr : नाशिकमध्ये बुधवारी (ता.16) शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड, ईव्हीएमसह राज्यातील अनेक घटनांवरून राज्य आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर सडकून टीका करताच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करण्याचं आव्हान देखील दिलं.
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या याच आव्हानाला आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ठाकरेंना उलट प्रश्न करत केला. ते म्हणाले, "एवढे दिवस उद्धव ठाकरे झोपले होते का? तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा मागणी केली का? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं?
पंतप्रधान आणि ते ठरवतील ना, शिवाजी महाराज तर आमच्यासाठी आदर्श आहेतच तो काही प्रश्नच नाही. शिवजयंतीची महाराष्ट्राला सुट्टी आहे. देशाबाबतचा निर्णय देखील ते घेतीलच. पण विनाकारण आता काही कामं शिल्लक राहिलेलं नाही म्हणून काहीही बोलायचं."
नाशिकमधील निर्धार शिबिरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "अमित शाहजी छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही महाराष्ट्रापुरते सिमित ठेवेलेलं नाही. महाराजांनी सुरत लुटली तेव्हाच ते जगाच्या कोनाकोपर्यात पोहोचले होते. पण तुम्हाला जर खरोखरच महाराजांबद्दल आदर असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा. इकडे येऊन केवळ मतांसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हणू नका."
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.