Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray Group News : पक्षाच्या सर्व्हेत पुढे असूनही उमेदवारी नको म्हणणारा 'तो' नेता कोण?

संपत देवगिरे : सरकारनामा

Uddhav Thackeray Shiv Sena Nashik News :

उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेते आपल्या सोयीचे सर्व्हे करतात. पाठीराखे नेत्यांकडे पाठवतात. शिवसेनेने (ठाकरे गट ) केलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या सर्व्हेमध्ये एका माजी आमदाराला नागरिकांनी पसंती दिली आहे. पण सिन्नरच्या या माजी आमदाराने लोकसभेची निवडणूक नको रे बाप्पा, असे म्हटले आहे.

आगामी Lok Sabha election 2024 च्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आणि संस्थांवर विसंबून न राहता राजकीय पक्षांनी देखील स्वतःच विविध मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. या या सर्व्हेचा अभ्यास करून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल लक्षात घेऊन उमेदवारांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत.

शिवसेनेने (ठाकरे गट) गेल्या महिन्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचा एक सर्व्हे केला आहे. तो सर्वे सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. या सर्वेमध्ये सद्य राजकीय स्थितीत कोणता उमेदवार पक्षाला यशस्वी करू शकेल, असा एक महत्त्वाचा प्रश्न होता. यासंदर्भात सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना मतदारसंघातून पक्षातील सध्याच्या इच्छुकांमध्ये सर्वाधिक पसंती मिळाल्याची चर्चा आहे.

यादृष्टीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाजे यांच्याशी संपर्क केला. मात्र वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यास स्पष्ट नकार दिला. सिन्नर विधानसभा मतदारसंघातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे कळते. सध्या ठाकरे गटात उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी ते जोरदार प्रयत्नही करत आहेत. काहींची लॉबिग सुरू आहे. अशा स्थितीत राजकारणात राहूनही अतिशय साधे व कोणताही वाद अंगावर न घेता, रुग्णसेवा आणि कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता अशी प्रतिमा असलेले माजी आमदार वाजे यांनी लोकसभेची उमेदवारी नको, असे कळविले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विशेष महत्त्व आहे. हा मतदारसंघ सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांचा आहे. या मतदारसंघामध्ये सर्व राजकीय पक्षांचे अस्तित्व नावापुरते असते. सध्या येथे आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे असे दोन गट आहेत. सबंध तालुक्यातील मतदार या दोन गटांमध्येच विभागले आहेत. तालुक्यातील कोणालाही उमेदवारी मिळाल्यास बहुतांश मतदार गट आणि पक्षाचे राजकारण बाजूला ठेवून त्या उमेदवाराला साथ देतात अशी परंपरा आहे. (Nashik Politics )

लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील आमदार कोकाटे अपक्ष उमेदवार होते. त्यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती. सबंध निवडणूक प्रचारात कोकाटे हा चर्चेचा विषय राहिले. यंदाच्या निवडणुकीतही उमेदवारीसाठी वाजे आणि कोकाटे या दोघांची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर वाजे यांनी नकार दिल्याने, कोकाटे यांची काय भूमिका असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT