Nashik News : भाजपमधील ठाकरे फुंकणार लोकसभेचं रणशिंग, पण...

Nitin Thackeray Nashik : सोमवारी सायंकाळी धनदाई लॉन्स येथे ठाकरेंच्या समर्थकांचा मेळावा होणार आहे
nitin Thackeray Nashik Loksabha Election
nitin Thackeray Nashik Loksabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nashik Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे ( Loksabha Election ) वारे वाहत आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. विविध मतदारसंघात उमेदवारांची चर्चा आणि तयारी जोरात आहे. नाशिक मतदारसंघातून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे ( Nitin Thackeray ) हे सोमवारी ( 5 फेब्रवारी ) आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. पण, भाजपा की शिवसेना ठाकरे गटातून लढविणार, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

nitin Thackeray Nashik Loksabha Election
Mns News : राज ठाकरेंनी वाढवली भाजपची डोकेदुखी, नेमकं कारण काय?

सोमवारी सायंकाळी धनदाई लॉन्स येथे ठाकरेंच्या समर्थकांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरेंनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद, मित्रमंडळी आणि नातेवाईकांना निमंत्रित केले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समर्थकांचा कल ठाकरे जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे हे येत्या निवडणुकीत उमेदवार असणार हे निश्चित झाले आहे. पण, कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार, याबाबत कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

गेल्या काही दिवसांपासून ॲड. ठाकरे लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू होती. ठाकरे शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) नेत्यांच्या संपर्कात असल्याचं समर्थकांकडून सांगितलं जात आहे. पण, शिवसेना ठाकरे गटानं याबाबत अद्याप कुठलेही संकेत दिलेले नाहीत. ठाकरे सध्या भाजपत ( Bjp ) असून नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष देखील आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस असलेले ठाकरे या संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात व जिल्ह्यात परिचित आहेत.

ठाकरेंचे वडील ॲड. बाबुराव ठाकरे हे देखील नामांकित वकील, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी म्हणून सर्वपरिचित होते. त्यांनी 1978 मध्ये नाशिक मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. या पार्श्वभूमीवर नितीन ठाकरे हे देखील सोमवारी आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडी व पक्षांच्या राजकारणातील इच्छुकांचे पत्ते पिसले जाण्याची शक्यता आहे.

nitin Thackeray Nashik Loksabha Election
Loksabha Election 2024: निवडणुकीपूर्वी पेटणारं पाणी लोकसभेत कोणाला तारणार ?

नाशिक लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष आणि आघाड्यांचे चित्र सद्यस्थितीत अतिशय गोंधळलेले आहे. येथील शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गट भाजपबरोबर आहे. अशा स्थितीत ही जागा शिंदे गटाला सोडण्यासाठी भाजपवर मोठा दबाव आहे. महाविकास आघाडीतर्फे ही जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात येणार आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील इच्छुकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

नितीन ठाकरेंच्या उमेदवारीने आघाडी आणि युती यांच्यातील इच्छुक उमेदवारांत मोठे फेरबदल होऊ शकतात. नितीन ठाकरेंनी घेतलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

Edited By : Akshay Sabale

nitin Thackeray Nashik Loksabha Election
Obc Elgar Melava : राम शिंदे, वडेट्टीवार एल्गार मेळाव्याला का आले नाहीत? काय आहे कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com