Uddhav Thackery In Jalgaon : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackery In Jalgaon : कोण गुलाबराव, कसला गुलाबराव , ठाकरेंच्या पठ्ठ्याने घेतले अंगावर !

Uddhav Thackery In Jalgaon Speech : ' जे हात दगड मारतील ते हात...'

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackery In Jalgaon Speech : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये चांगलच राजकारण तापलं आहे.

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार'', असा इशारा राज्याचे मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी दिला होता. त्यानंतर संजय राऊतांनीही त्यांना चॅलेंज देत सभेत घुसून दाखवा, असं म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेनेचे (शिंदे गट) शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी एका व्हीडीओतून थेट गुलाबराव पाटलांना दम दिला आहे.

"गुलाबराव राजकारण गेलं खड्डयात, आता तुमचं आणि आमचं बनलंय, तुम्हाला आता शिवसैनिकांच्या हातून सुट्टी नाही, तुम्हाला शिवसैनिक राज्यात फिरू देणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी एका व्हीडीओ व्दारे दिला आहे.

"कोण गुलाबराव, कसला गुलाबराव, कुठला गुलाबराव, जळगाव जिल्हा कुणाच्या बापाची जहागिरदारी नाही, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि उध्दव ठाकरेंच्या सभेमध्ये दगड बंद पाडू, अरे कुणाच्या सभेत दगड मारणार,उध्दव साहेबांच्या सभेत जर कुणी दगड मारण्याचा प्रयत्न केला, जे हात दगड मारतील ते हात शिवसैनिक कलम केल्याशिवाय सोडणार नाहीत, दगड मारणारे ज्या पायाने चालत येतील, त्यांचे पाय देखील काढून टाकतील, असा इशारा शरद कोळी यांनी दिला.

कोळी पुढे म्हणाले, "शिवसैनिक तुम्हाला कुत्र्यासारखे तुडवतील, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही तुम्हाला भीत नाही. या तुम्ही, तुम्ही कार्यकर्त्यांना पाठवताय का, तुम्ही त्यांचे घर उन्हात बांधायला निघाला आहात, तुम्हाल काय वाटते आपण वाघ आहोत, परंतु बोकडाच्या अंगावर वाघाचे कातडे पाघंरल्यावर बोकडालाही तसेच वाटते. वाघ हा वाघच असतो आणि बोकड हे बोकडच."

"उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्या नादाला लागायचे नाही. तुम्ही जर उध्दव साहेबाच्या सभेत दगड मारायचा प्रयत्न केला तर जिल्ह्यातील शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाहीत, राजकारण गेल खड्डयात, तुमच आणि आमचं आता बनलय, तुम्हाला शिवसैनिक महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा सज्जड दमच कोळी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT