Nashik, Ulhas Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Political News : नाशिक, दिंडोरी लोकसभेसाठी काँग्रेसची रणनीती तयार; ठाकरे-पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : शिवसेनेनंतर वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरला. त्यानंतर काँग्रेसला कर्नाटक राज्यात मोठे यश मिळाले. यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदरासंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा लढवणार असल्याचे काँग्रेसने सांगितल्याने यावर शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

नाशिक शहर काँग्रेस व जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. यावेळी लोकसभा निवडणूक २०२४ला नाशिक व दिंडोरी लोकसभा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचे लोकसभा निवडणुकीचे निरीक्षक माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. पुढील काळात बूथपासून ब्लॉकपर्यंत तसेच तालुकास्तरावर ग्रामीण भागात, शहरात कार्यकर्त्यांची मजबूत उभी करून लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष निवडून येईल, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला.

जिल्ह्याचे प्रभारी डॉ. राजू वाघमारे यांनी लवकरच नाशिक जिल्ह्याचा तालुका, तालुकास्तरावर दौरा करणार असल्याची माहिती दिली. काँग्रेसचा विचार राहुल गांधींचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर आहे. पक्षाला चांगले दिवस येऊ घातलेले असताना निवडणुकीतील यश कसे प्राप्त होईल, याबाबत त्यांनी अवलोकन केले. तर राजाराम पानगव्हाणे, संदीप गुळवे, संपतराव सकाळे, रमेश कहांडोळे यांच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली.

आगामी काळामध्ये शहर व जिल्ह्यात बस यात्रा तसेच पदयात्रा नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती सहप्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांनी दिली. नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी शहर काँग्रेसच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, काँग्रेस नेते संपतराव सकाळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव राहुल दिवे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नंदकुमार कर्डक, संदीप गुळवे, प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांनी आपले विचार मांडले.

Nashik Congress Meeting

यावेळी रमेश कांडोळे, वत्सला खैरे, डॉ. सुभाष देवरे, उल्हास सातभाई, संदीप शर्मा, हनिफ बशीर, बबलू खैरे, गौरव सोनार, संतोष ठाकूर, अल्तमश शेख, स्वप्नील पाटील, स्वाती जाधव, निर्मला खर्डे, जुली डिसूजा, सुनील आव्हाड, प्रशांत बाविस्कर, ज्ञानेश्वर काळे, मधुकर शेलार, लांडे मामा, संजय जाधव,नंदकुमार कर्डक, शरद बोडके, विजय पाटील, राजकुमार जेफ, वंदना पाटील, कल्पेश जेजुरकर, जावेद इब्राहिम, दाऊद शेख, साजिया शेख, एलिझाबेथ सत्यम, किरण जाधव, सोमनाथ मोहिते, इसाक कुरेशी, अशोक लहांगे,दर्शन पाटील, संतोष हिवाळे, अनिल बहोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT