Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale : 'हिंदू-मुस्लिम मुलं-मुली एकत्र येणं म्हणजे, 'लव्ह जिहाद' नव्हे'; मंत्री आठवलेंनी महायुतीला ठणकावले

Union Minister Ramdas Athawale Love Jihad Mahayuti government Shirdi : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धर्मांतर बंदी कायद्याबाबत मोठे विधान केले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. याबाबत मंत्री नीतेश राणे आक्रमक आहे. पण आता महायुतीमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या कायद्याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे.

'हिंदू-मुस्लिम लग्न झाले की, त्याला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी', अशी स्पष्ट भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, "लव्ह जिहाद कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम, दलित-सुवर्ण मुलं-मुलीसुद्धा एकत्र येतात. लग्न होतात. हिंदू-मुस्लिम लग्न झाले की, त्याला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायदा असावा. तशी तरतूद असावी".

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्वांना समान धरतात. हिंदू-मुस्लिम असं करत नाहीत. सर्व योजनांचा लाभ सर्वांना देतात. ते मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. मुलाने हिंदू धर्म स्वीकारावी अशी तरतूद असावी. मुले-मुली एकत्र आले अन् सहमतीने लग्न झाले, तर त्यात वावगे काय? असा प्रश्न देखील रामदास आठवले यांनी उपस्थित केला.

शिर्डीतील गुन्हेगारीविषयी चिंता

रामदास आठवले यांनी शिर्डीतील गु्न्हेगारीविषयी चिंता व्यक्त केली. लुटीच्या उद्देशाने दोन निरापराध लोकांची हत्या झाली आहे. पोलिसांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन, शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, यासाठी पोलिसांना आपले देखील सहकार्य असेल, असेही ते म्हणाले.

'त्या' कर्मचाऱ्यांना CM निधीतून मदत

शिर्डीतील साईसंस्थानच्या दोन निरापराध लोकांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी नातेवाईकांची मागणी आहे. मयतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT