Sangamner Acid Attack Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner Acid Attack Case : संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण तापले! दोन महिने उलटले तरी आरोपी फरार; डॉ. थोरातांनी पीडितेसाठी पोलिस अधीक्षकांकडे मागितला न्याय

Two months after Vadgaon Pan acid attack minor girl, Dr. Jayashree Thorat urges police expedite investigation and arrest accused : संगमनेरच्या वडगाव पान इथल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरील ॲसिड हल्ल्याचा तपास रखडल्याचा आरोप करत पीडितेला न्याय देण्यासाठी डाॅ. जयश्री थोरात यांनी तातडीच्या कारवाईची मागणी केली.

Pradeep Pendhare

Sangamner Crime News : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला तब्बल दोन महिने उलटून गेले असतानाही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी संगमनेर युवक काँग्रेस तसेच एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली आहे.

डॉ. जयश्री थोरात यांनी नुकतीच जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि संगमनेर (Sangamner) तालुक्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करत तपासाच्या संथ गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटनेला दोन महिने उलटून गेले, मात्र आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. यामुळे पीडित कुटुंबासह नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस (Police) प्रशासनाने या तपासाला गती देऊन आरोपींचा तातडीने शोध घ्यावा आणि पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

ॲसिड हल्ला प्रकरणाने अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्य हादरले होते. विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत: लक्ष घातले होते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील पीडितेची भेट घेत, शासकीय मदतीचा लाभ मिळवून दिला होता.

दरम्यान, डॉ. थोरात यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचीही भेट घेत विविध सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनासोबतच समाजानेही अधिक जबाबदारीने पुढे येण्याची गरज अधोरेखित केली.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून समाजात जागरूकता, संवेदनशीलता आणि सामूहिक सहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांना सुरक्षित वातावरण आणि वेळेवर न्याय मिळवून देणे ही प्रशासनासह संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही डॉ. जयश्री थोरात यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT