Girlfriend Family Assault : लव्ह स्टोरीचा दुर्दैवी शेवट! प्रेयसीसोबत दिसताच, बेदम मारहाण; नैराश्यात युवकानं संपवलं जीवन, मुलीच्या वडिलांना अटक

A young man in Karjat, Ahilyanagar died by suicide after alleged assault by his girlfriend family; police have arrested the girl father : प्रेयसीच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीने आलेल्या नैराश्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत इथल्या युवकाने आत्महत्या केली.
Girlfriend Family Assault
Girlfriend Family AssaultSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar youth suicide : प्रेमसंबंध असलेल्या युवतीबरोबर गावच्या यात्रेत फिरताना दिसल्यानंतर, प्रियकर युवकाला मुलीच्या नातेवाइकांनी आणि काहींनी बेदम मारहाण केली. यानंतर युवकाला आलेल्या नैराश्यातून त्याने राहात्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

ओंकार सुभाष एकाड (वय 20, रा. खांडव, ता. कर्जत) असे गळफास घेणाऱ्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मुलीच्या वडिलांसह इतरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्ती केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक (Arrest) केली असून, इतर पसार झाले आहेत.

ओंकार (Ahilyanagar) याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. शिंदा गावच्या यात्रेत हे दोघं एकत्र फिरले. या दोघांना एकत्र फिरताना, मुलीच्या नातेवाइकांनी पाहिले. तसेय मुलीच्या गावकऱ्यांनी देखील पाहिले. मुलीच्या नातेवाइकांसह गावकऱ्यांना राग आला.

मुलीच्या नातेवाइक आणि गावकऱ्यांनी ओंकार याला हेरलं अन्, लाथाबुक्कांनी मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याला घरी नेत पुन्हा मारहाण (Crime) केली आणि धमकावले. या प्रकाराचा ओंकार याला चांगलाच मानसिक आणि शारीरिक धक्का बसला अन् नैराश्यात गेला.

Girlfriend Family Assault
Extortion Case : हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा खंडणी मागण्याचा सपाटा; राज्यमार्ग प्रकल्प संचालक अन् शिवसेनेच्या शिलेदाराच्या नातेवाइकांना केलं टार्गेट?

कर्जत इथल्या बाजारतळावरील निलंगे यांच्या इमारतीत राहाणारा ओंकार गळफास घेतल्याच्या स्थितीत मित्रांना आढळला. कर्जत पोलिसांना माहिती देताच, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, निरीक्षक सोपान शिरसाट यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Girlfriend Family Assault
Ashok Kharat ED probe : अशोक खरातचं आर्थिक साम्राज्य उघड! 60 बँक खात्यांतून कोट्यवधींची उलथापालथ; ED तपासात धक्कादायक माहिती समोर

ओंकार एकाड यांच्या घरच्यांनी मुलीच्या नातेवाइकांनी आणि इतरांनी केलेल्या मारहाणीपासून तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचा आरोप केला. ओंकार याचे वडील सुभाष यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. कर्जत पोलिसांनी त्यावरून गुन्ह्याची नोंद घेतली.

मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांना अटक करेपर्यंत ओंकार याचा मृतदेहाला हात लावणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. या मुळे कर्जत पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण कर्जत पोलिसांनी कारवाई सुरू करताच, ओंकार याच्या नातेवाइकांचा रोष काहीसा शांत झाला.

कर्जत पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह इतर सात ते आठ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. इतर सात ते आठ जण पसार झाले आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, पथकं रवाना केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com