Ujjwal Nikam, Valmik Karad sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Valmik Karad : वाल्मिक कराडला बीडमधून नाशिक कारागृहात हलवणार? उज्ज्वल निकम यांनी सांगितलं काय ते..

Ujjwal Nikam comments on possibility of Valmik Karad's transfer from Beed to Nashik jail amid ongoing legal proceedings : बीड कारागृहात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाल्मिक कराडला नाशिकला हलवण्याची योजना असल्याचं बोललं जात आहे.

Ganesh Sonawane

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला बीडमधून नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्याची शक्यता गेल्या आठवड्यापासून वर्तवण्यात येत आहे. त्यासंदर्भात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे.

बीड कारागृहात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाल्मिक कराडला नाशिकला हलवण्याची योजना असल्याचं बोललं जात आहे. त्यावर उज्वल निकम यांनी माध्यंमाशी बोलताना सांगितलं की, वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. तुरुंग प्रशासनच याबाबत निर्णय घेइल. न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही.

न्यायालयानेही याबाबत आमच्याकडे विचारणा केलेली नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात आहे. वाल्मीक कराडला कुठल्या तुरुंगात ठेवणं हे अधिक सुरक्षित राहील, याबाबत मला माहिती नाही असही ते म्हणाले.

वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्ती करण्या बाबतच्या अर्जावर आज कोर्टात युक्तिवाद झाला. आजच्या सुनावणीला अॅड, उज्वल निकम उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 22 जुलै रोजी होणार आहे. वाल्मिक कराडला दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर 22 तारखेलाच सुनावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी वाल्मिक कराड यांचे बँक खाते सील करण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी न्यायालयात केली आहे. तसेच प्रॉपर्टी जप्तीसाठी केलेल्या अर्जावर देखील येत्या 22 जुलैला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सुनावणीवेळी न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

दरम्यान वाल्मिक कराडला बीड कारागृहात अक्षय आठवले याच्या टोळीने मारहाण केली होती. त्यामुळे 1 एप्रिल 2025 ला अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर व ओंकार सवाई यांना नाशिक कारागृहात हलविण्यात आलं होतं. त्यामुळे कराडचे वैरी आधीच नाशिक कारागृहात असताना जर कराडलाही नाशिक कारागृहात हलवण्यात आलं तर गॅंगवार भडकण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT