Shivsena UBT delegation with Nashik Collector Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vasant Gite Politics: नाशिक मध्य मतदारसंघात बोगस मतदार, वाद पोहोचला उच्च न्यायालयात!

Vasant Gite politics; Bogus voters in Nashik centre constituency, dispute in the High Court-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांचा गंभीर आरोप, प्रशासन कोणाच्या दबावाखाली?

Sampat Devgire

Shivsena UBT News: विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचे उघड झाले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना भेटले. यावेळी त्यांनी नाशिक मध्य मतदारसंघातील यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे सांगितले. या मतदार यादीत बोगस आणि मतदारसंघाबाहेरील लोकांची नावे नोंदविण्यात आली आहेत.

या संदर्भात गेले महिनाभर निवडणूक निर्णय अधिकारी आणि बीएलओ यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही.

बोगस मतदारांच्या नावांबाबत पुरावे देऊनही प्रशासनाने काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत ऑनलाईन मतदान नोंदणीत गरुडा या संगणक प्रणाली व संबंधीत कर्मचारी कोणाच्या राजकीय दबावाखाली काम करीत आहे? असा प्रश्न यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आला.

ठराविक कार्यकर्त्यांनी दिलेली मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली नावे जाणीवपूर्वक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघातील ही सबंध प्रक्रिया संशयास्पद वाटते, अशी नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भात ज्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आणि रिजेक्ट करण्यात आले अशा मतदारांच्या नावान पुढे बीएलओ यांनी प्रत्यक्ष तपासणी करावी. संबंधितांच्या पत्त्यांवर भेट देऊन ती नावे योग्य असल्यास रोल बॅक करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मध्य मतदारसंघात नवी मतदार नोंदणी करताना रहिवासी दाखले तसेच अन्य पुरावे खोटे देण्यात आले आहेत. त्याद्वारे या मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे दिसत आहे.

त्याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी विवेक पंजाबी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वीची याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये नाशिक मध्य मतदारसंघात अनेक बोगस मतदारांची नावे असल्याचे सप्रमाण मांडण्यात आले आहे.

सर्व बोगस मतदारांची नावे जाणीवपूर्वक आणि राजकीय दबावाखाली नोंदविण्यात आल्याचा आरोप यावेळी शिस्तमंडळांने केला. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी याबाबत चौकशी करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, बाळासाहेब पाठक, माजी नगरसेवक सचिन मराठे, राजू मोरे, सरप्रीत बलसिंग, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, आकाश खोडे, प्रवीण जाधव आदींनी विविध माहिती देत चर्चेत भाग घेतला. एकंदरच हा मतदारसंघ संवेदनशील बनल्याचे जाणवू लागले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT