Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीची राज्यात आचारसंहिता लागली आहे. त्यामुळए राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.
दोन्हींकडे जागा वाटपावरून बराच घोळ सुरू आहे. काही ठिकाणी असे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत की, त्यातून मार्ग काढण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस स्वतः शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. महायुती मित्र पक्षातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आहेत. तिथं भाजपच्या (BJP) माजी आमदार स्नेहलता कोल्हे इच्छुक आहेत. इथं थांबवायचं कोणाला, असा प्रश्न आहे. यातच कोल्हे यांचं भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी राजकीय द्वंद सुरू आहे. त्यामुळे स्नेहलता कोल्हे कोणतीही राजकीय तडजोड स्वीकारायला तयार नसून संघर्षासाठी शड्डू ठोकला आहे. त्यांचे चिरंजीव युवा नेते विवेक कोल्हे यांचा झंझावतानं आमदार काळे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे हा राजकीय पेचप्रसंग सोडवण्यासाठी आता भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांचे राजकीय आव्हान आहे. यामुळे आमदार काळेंची राजकीय कोंडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad pawar) आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली होती. या ज्येष्ठ आणि युवा नेत्यांनं एकत्र प्रवास देखील केला होता. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं होते. एकप्रकारे, युवा नेते विवेक कोल्हे शरद पवार यांची तुतारी हातात घेणार, अशीच चर्चा होती.
कोल्हे कुटुंबीय वेगळा निर्णय घेण्यापूर्वीच भाजपने सावधगिरी दाखवला सुरवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या मातुश्री कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजपच्या माजी प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना चर्चेसाठी मुंबई येथे आमंत्रित केले आहे. कोल्हे कुटुंबीयांनी वेगळा निर्णय घेऊ नये यासाठी भाजप संपूर्ण ताकद लावत असून या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र विवेक कोल्हे यांची काय भूमिका आहे? सध्या तरी हे कळू शकले नाही.
कोल्हे कुटुंब भाजपसाठी महत्त्वाचे असल्याने मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना भाजपमध्ये थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे यांना चर्चेसाठी बोलवून घेतले होते. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळू शकलेले नाही. परंतु महायुतीमधील मित्रपक्षांची कोंडी होऊ नये, यासाठी ही फडणवीस आणि कोल्हेंमधील चर्चा महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. तसंच मतदार संघात कोल्हे कुटुंबांन काही वेगळा निर्णय घेऊ नये, यावरच फडणवीसांनी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या पाच जिल्ह्यांच्या मतदार संघात विवेक कोल्हे यांनी आपली ताकद सिद्ध केली. पसंतीच्या मतदानामध्ये ते दुसऱ्या क्रमाकांवर राहिले. कोपरगावसह येवला, सिन्नर, गणेश कारखाना आहे. तसंच जगप्रसिद्ध शिर्डी देवस्थानची कर्मचारी सोसायटी देखील वर्चस्व आहे. त्यामुळे कोल्हे कुटुंब या निवडणुकीत कोणता निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.