radhakrishna vikhe patil vivek kolhe sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Teacher Constituency Election : विखेंना थेट भिडणारे विवेक कोल्हे आमदारकीसाठी मैदानात

Sampat Devgire

Nashik News, 31 May : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली. या मतदारसंघातून यंदा अनेक संस्थाचालक इच्छुक आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

शिक्षक मतदारसंघातून कोपरगावच्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था अभिमात विद्यापीठाचे अध्यक्ष विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेले महिनाभर त्यांचे समर्थक नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन उमेदवारीची तयारी करीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे या मतदारसंघातून एक प्रभावी उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत. इफको, महाराष्ट्र राज्य साखर संघ, नगर जिल्हा बँक, कोपरगाव औद्योगिक संस्था अशा विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत. त्यांनी आज आपल्या समर्थकांसह आणि मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार उपस्थित होत्या.

या मतदारसंघातून यंदा शिक्षक उमेदवार असावा यासाठी गेले सहा महिने प्रयत्न सुरू होते. विशेषतः शिक्षक लोकशाही आघाडी 'टीडीएफ' या संघटनेची निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्यांचे याबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या संघटनेने नाशिकचे संदीप गुळवे, नगरचे भाऊसाहेब कचरे आणि तिसऱ्या गटाने आप्पासाहेब शिंदे असे तीन उमेदवार जाहीर केले आहेत.

सध्याचे चित्र पाहता विधान परिषदेच्या या मतदारसंघातून शिक्षकांची उमेदवारी हा विषय मागे पडल्याचे दिसते. आता नगर नाशिक आणि धुळे या तिन्ही जिल्ह्यातून संस्थाचालकांनी उमेदवारीसाठी तयारी केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत अन्य उमेदवार देखील अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT