Nashik Teachers Constituency
Nashik Teachers Constituencysarkarnama

Nashik Teachers Constituency Election : शिक्षकांमध्ये घमासान, 'टीडीएफ'ची चार शकले; संस्थाचालकांमध्ये रस्सीखेच...

Teachers Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून शिक्षक आणि संस्थाचालकांमध्ये घमासान सुरू आहे. टीडीएफमध्ये चार तुकडे पडले असून, नगरमधून टीडीएफचे दोन उमेदवार निडवणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

Nagar News : शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने नाशिक मतदारसंघात शिक्षकांमध्ये (Teachers Constituency) उमेदवारीवरून घमासान सुरू आहे. नगर जिल्ह्यातून पाच जण इच्छुक असून रिंगणात किती उतरणार, याची उत्सुकता आहे. शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये (टीडीएफ) फूट पडली असून, चार शकलं झाली आहे. चारही गटाने त्यांची उमेदवार रिंगणात उतरवली असून त्यात नगर जिल्ह्यातील दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे.

शिक्षक विधान परिषदेची निवडणूक (Election) 26 जूनला होत असून, निवडणूक प्रक्रियेला उद्या शुक्रवारपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. निवडणुकीत 65 हजार मतदार आहे. उमेदवाराला पसंती क्रमांकानुसार मतदान करायचे आहे. नगर, नाशिक (Nashik), धुळे, नंदुरबार आणि जळगाव या पाच जिल्ह्यांमध्ये नाशिक शिक्षक विधान परिषदेचा मतदारसंघ विखुरलेला आहे. किशोर दराडे या मतदारसंघाचे अपक्ष म्हणून 2018 मध्ये निवडणूक आले होते. त्यांचे बंधू नरेंद्र दराडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Teachers Constituency
Nashik Teachers Constituency : अजितदादांच्या भिडूची इच्छा, आमदार व्हायचंच म्हणतोय...

शिक्षक (Teachers) लोकशाही आघाडीमध्ये (टीडीएफ) उमेदवारीवरून फूट पडली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या आतापर्यंतच्या सहा निवडणुकांपैकी तब्बल पाच निवडणुका शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) जिंकल्या आहेत. पण यंदा निवडणुकीनिमित्ताने टीडीएफचे चार शकले पडली आहेत. 'टीडीएफ'मधील निवृत्तांच्या गटाने भाऊसाहेब कचरे, नाशिक टीडीएफ गटाने संदीप गुळवे, धुळे (Dhule) टीडीएफ गटाने निशांत रंधे आणि कार्यरत गटाच्या 'टीडीएफ'ने नगरचे अप्पासाहेब शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संस्थाचालकांपैकी प्रवरा शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र विखे, कोपरगावच्या संजीवनी शिक्षण संस्थेचे विवेक कोल्हे आणि महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे असे तिघे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. संस्थाचालकांपैकी विखे आणि कोल्हे भाजपला (BJP) मानणारे आहेत तर पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे समर्थक आहेत. महायुतीमध्येच या उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे आहेत.

Nashik Teachers Constituency
MLC Election 2024 : विधान परिषदेची निवडणूक शिक्षकांच्या हातून निसटली, आता रंगणार राजकीय आखाडा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com