Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : सत्ता लालसेपोटी फडणवीसांनी आरक्षणाच्या आडून..; विजय वडेट्टीवारांनी सर्वच काढलं

Pradeep Pendhare

Vijay Wadettiwar News : काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. आरक्षणाच्या आडून राज्यातील सामाजिक सलोखा कसा बिघडवला आणि ही आग कशी वाढवली, याचं सर्वच वडेट्टीवार यांनी काढलं.

"सत्तेच्या लालसेपोटी फडणवीसांनी विविध समाजाला आरक्षण देण्याचा आश्वासन दिले. यातून सरकारने समाजातील सलोखा उद्ध्वस्त केला. विविध समाजामध्ये आग लावण्याचे काम सरकारने केले", असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

काँग्रेसचे (Congress) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिर्डीत येत साईबाबा मंदिरात साईसमाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य केले.

"ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेला संघर्षावर भाष्य करताना राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राजकीय पार्श्वभूमी नाही. तरी देखील हाके आरक्षण संरक्षणाचा मुद्दा ठळकपणे मांडत आहे. त्यांची मागणी योग्य असल्याने सरकारने त्यावर लेखी आश्वासन देण्यास हरकत नाही", असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

"राज्यातील भाजप, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारला मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटवत ठेवायचा आहे. ही आग सत्तेच्या लालसेपोटी वाढवायची आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणे आणि जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय आरक्षणावर तोडगा निघणार नाही", असे विजय वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.

"पक्ष फोडणे, यंत्रणाचा गैरवापर करणे हेच या सरकारला उत्तम जमते. नीट परीक्षा यांनी 'नीट' घेता येत नाहीत. उद्या भलतेच डाॅक्टर तयार झाल्यास समाजाचे भवितव्य काय राहील. हे सरकार समाजाशी खेळत असून सामाजिक सलोखा बिघडवत आहे", असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. फडतूस सरकारचे फडतूस कारभार सुरू असून, लोकांबरोबर समाजाशी खेळ सुरू आहे. लोकांनी हा खेळ ओळखला असून, हे सरकार उलथून लावणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT