Nandurbar, 4 April : डॉ. विजयकुमार गावित 1995 मध्ये निवडणूक लढण्यासाठी आले होते, तेव्हा ते उपरे टपरे नव्हते का? ते आकाशातून टपकले का? डाॅ. गावित यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्याबाबत केलेले वक्तव्य मतदारसंघातील तरुणांचे अपमान करणारे आहे. मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रत्युत्तर माजी मंत्री, ॲड. के. सी. पाडवी यांनी आदिवासी विकासमंत्री तथा भाजप नेते विजयकुमार गावित यांना दिले.
नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून (Nandurbar Lok Sabha Constituency) डॉ. हीना गावित (Heena Gavit) यांना भाजप महायुतीकडून (Mahayuti) पुन्हा तिकीट मिळाले आहे. महाविकास आघाडीकडून ॲड. गोवाल पाडवी यांना तिकीट जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नंदूरबार लोकसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. विजयकुमार गावित यांनी गावोल पाडवी यांच्यावर बाहेरचे उमेदवार म्हणून टीका केली होती. त्याला ॲड. के. सी. पाडवी ( K. C. Padvi) यांनी प्रत्युत्तर दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदिवासी विकासमंत्री तथा भाजप नेते डाॅ. विजयकुमार गावित यांनी महाविकास आघाडीचे नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्यावर ते उपरे टपरे आहेत. गावात त्यांना कोणी ओळखत नाही, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना के. सी. पाडवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत गावितांची घमेंड उतरेल. मतदार त्यांना धडा शिकवतील.
विजयकुमार गावित हे 1995 ला उपरे टपरे नव्हते का? का ते आकाशातून टपकले आहेत. डाॅ. विजयकुमार गावित यांचे पाडवी यांच्याबाबतचे वक्तव्य मतदारसंघातील तरुणांचे अपमान करणारे आहे. मतदार त्यांना निवडणुकीत निश्चितपणे धडा शिकवतील, अशा शब्दांत डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर हल्लाबोल केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.