Uddhav Thackeray & Vinod Tavde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vinod Tawde : विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले शिवसेनाप्रमुख असते तर...

Vinod Tawde Assigned Maharashtra Assembly Election Responsibility: भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Sampat Devgire

Maharashtra Vidhan Sabha Election: माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संदर्भात ते सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच फैलावर घेतले.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव तावडे यांच्या उपस्थितीत काल भाजपचे नाशिक पूर्वचे उमेदवार आमदार राहुल ढिकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्री तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

श्री. तावडे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात अनेक योजना बंद करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत हे सर्व प्रकार घडले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जनतेपर्यंत कोणताही लाभ पोहोचू नये, असे वाटते. त्यामुळे त्यांनी अनेक योजना कशा बंद पडतील याला महत्त्व दिले. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना देखील बंद करण्याचा त्यांचा विचार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. यापासून तर विविध अडचणी आणि अपप्रचार ते करत असतात. शरद पवार यांना काहीही वाटले तरी महायुती सरकार मात्र लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री तावडे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. भारतीय जनता पक्षाशी गद्दारी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अशी गद्दारी सहन केली नसती.

शिवसेनाप्रमुख ठाकरेंच्या काळात कोणतीही गद्दारी होत नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गद्दारीचा देखील शिवसेनाप्रमुखांनी योग्य तो निवाडा केला असता, असा दावा तावडे यांनी केला.

भारतीय जनता पक्षाची नीतिमत्ता नेहमीच स्वच्छ आणि साफ राहिली आहे. भाजप निवडणुकीआधी व त्यानंतरही कधीच वेगळी भूमिका घेत नसतो. आमचे नैतिक धोरण साफ आहे. या उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कोणतेही स्पष्ट धोरण नाही.

निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा काय करायचे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे मतदार महाविकास आघाडीला कोणत्याही स्थितीत सत्तेत येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलेली दिसेल, असा दावा त्यांनी केला.

राज्यात उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये नाराजी आहे. अनेक मतदारसंघात बंडखोरीचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात तावडे यांनी आपले मत मांडले. उमेदवारी एकालाच मिळत असते. इच्छुक अनेक असतात. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मात्र या नाराजांची पक्षाच्या माध्यमातून समजूत काढली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT