Uddhav Thackeray: चोपडा मतदारसंघाचा उमेदवार बदला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाठली थेट "मातोश्री"

Chopda Assembly Constituency: चोपडा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध
Uddhav Thackrey
Uddhav ThackreySarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर नामुष्की ओढवली आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघ कोणाचा यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रदीर्घकाळ ओढाताण सुरू होती. कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ सोडायचा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती.

या मतदारसंघात प्रदीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राहिल्याचा दावा पक्षाने केला होता. दोन दिवसापूर्वी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यास संमती दिली होती. त्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली.

मात्र श्री तडवी यांना चोपडा मतदारसंघात कोणीही ओळखत नव्हते. शिवसेना ठाकरे पक्षाबरोबरच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही राजू तडवी कोण? असा प्रश्न पडला होता. अनेकांनी स्थानिक पातळीवर या उमेदवाराचा शोध घेण्याचा देखील प्रयत्न केला.

Uddhav Thackrey
Igatpuri Congress : इगतपुरीमध्ये लकी जाधव यांच्या उमेदवारीचा निषेध, ६५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत संपर्क केल्यावर संबंधित राजू अमीर तडवी हे मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाहेरचा उमेदवार स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली.

याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री तडवी यांना मतदारसंघात कोणीही ओळखत नाही. तडवी यांचा देखील मतदारसंघाशी काहीही संपर्क नाही. ते मुंबई शहरात स्थायिक आहेत.

त्यामुळे या उमेदवाराचा प्रचार करणे आणि मतदारांमध्ये त्याबाबतचा संदेश देताना अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. चोपडा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी स्थानिक उमेदवारांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

Uddhav Thackrey
Mahayuti : महायुतीमधील भाजप-शिवसेना निर्णय घेईना; 'त्या' तीन जागा कोणाकडे? इच्छुकांमध्ये अस्वस्थता

त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत चोपडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विजय परब माजी तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे यांचा विविध पदाधिकाऱ्यांनी रविवारी थेट मुंबईत मातोश्री गाठली.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. चोपडा विधानसभा मतदारसंघात यंदा अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राजू तडवी यांना स्थानिक कार्यकर्ते अथवा नागरिकांची कोणताही संपर्क नाही. तडवी हे मुंबईत स्थायिक आहेत.

त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पक्षप्रमुख ठाकरे यांनी याबाबत सोमवारी संबंधितांची चर्चा करून निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यानंतर हे पदाधिकारी चोपडा मतदारसंघात परतले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी उमेदवार राजीव तडवी यांच्याशी देखील संपर्क केला. त्यांना चोपडा मतदारसंघाची परिस्थिती समजावून सांगितली.

आता लवकरच चोपडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. चोपडा मतदारसंघातील उमेदवारी बदलावा. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा दबाव निर्माण केला आहे. तो किती यशस्वी होतो, हे आज स्पष्ट होईल.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या टप्प्यातच शिवसेनेला उमेदवार बदलण्यासाठी आपली शक्ती खर्च करावी लागत आहे. ते भाजपच्या पथ्यावर पडते की काय अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com