VHP morcha in Bhagur
VHP morcha in Bhagur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विश्व हिंदू परिषदेचा पोलिसांविरोधात मोर्चा, संतप्त नेते मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार!

Sampat Devgire

नाशिक : भगुर (Nashik) परिसरात अज्ञात व्यक्तीने गाईची कत्तल केल्याने नागरिक संतप्त आहेत. याबाबत चार दिवस होऊही पोलिसांनी (Police) आरोपांना अट केलेली नाही. त्यामुळे याबाबत येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. (All party Hindu people agitation in Bhagur for Police action against Anti social element)

पोलिसांनी शांततेचे आवाहन केल्यावर सर्व पक्षीय नागिरकांनी पोलिसांशी चर्चा केली. याबाबत चार दिवसांत संशयितांना अटक करण्यात येईल व कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले होते. ही मुदत काल संपली. त्यामुळे आज विश्व हिंदू परिषदेसह विविध पक्षाच्या समर्थकांनी भगूरला मोर्चा काढला. त्यानंतर आमदार सरोजताई अहिरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगितले.

याबाबत विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते एकनाथ शेटे यांनी ही घटना अत्यंत गंभीर आहे. समाज कंटकांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी हे घृणास्पद कार्य केले आहे. त्याचा सखोल तपास केला जावा. मात्र पोलिस प्रशासन निष्क्रीय आहेत. त्यांनी याबाबत ठोस कारवाई केलेली नाही. पोलिसांनी समाजकंटकांना अटक करावी. त्यांच्यांवर गंभीर कारवाई करून त्यांना जामीन मिळणार नाही, अशी तजवीज करावी अशी मागणी केली.

ही घटना घडल्यावर नागरिकांमध्ये नाराजी होती. याबाबत पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येत त्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्याबाबत पोलिस घटनास्थळी आल्यावर नागरिकांनी पोलिसांनी धारेवर धरले. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने हे जाणिवपूर्वक घडवून आणले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT