मतदान झाले तर शिंदे गटाला ५० मतेही मिळणार नाहीत!

महापालिका कर्मचारी सेनेवरील वर्चस्वावरून दोन्ही गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक म्युनिसिपल (NMC) कर्मचारी कामगार सेनेचे कार्यालय पोलिसांनी (Police) दोन दिवसांपूर्वी सील केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) संघर्षामुळे हे घडले. या वादात पोलिसांनी सत्तेच्या बाजूने अवाजवी हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरु आहे. कर्मचाऱ्यांमध्ये त्याचा विपरीत संदेश गेल्याने या वादात कर्मचारी शिंदे गटापासून दुरावण्याची चिन्हे आहेत. (Employees angry on police intervention in NMC Employees sena dispute)

Sudhakar Badgujar
शिंदे- ठाकरे वाद; नाशिक पोलिस जरा जास्तच सक्रीय झाले!

या वादावर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि उद्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, महापालिका कर्मचारी कोणाच्या बाजुने आहेत, हे सर्वांना माहित आहे. असे असताना काही लोक शिंदे गटाच्या नावावर लुडबूड करून स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यात काहीच दम नाही. त्यामुळे ते फार काळ चालणार नाही. त्यांनी कितीही सत्तेचा वापर केला तरी विजय सत्ताचाच होईल.

Sudhakar Badgujar
माझी बांधिलकी जनतेशीच, फक्त विकासासाठी भाजप बरोबर!

श्री. बडगुजर म्हणाले, मला नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने अध्यक्ष निवडले आले. महापालिका कर्मचारी सेनेचे १५०० कर्मचारी सदस्य आहेत. उद्या मतदान घेतली तरी १४५० कर्मचारी आम्हाला मतदान करतील उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंचा दारूण पराभव होईल. यामध्ये पोलिसांनी पोलिस बळाचा जो वापर केला तो कर्मचाऱ्यांना आवडलेला नाही. त्याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांवर झाल्याने ते शिंदे गटावर संतापले आहेत.

काय आहे प्रकरण?

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्ष पदावरून गेल्या महिन्याभरापासून वाद सुरू आहे. संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे सूत्रे सोपविली होती. बडगुजर यांनी मागील आठवड्यात महापालिका मुख्यालयात संघटनेच्या अध्यक्षपदाचे सूत्रे स्वीकारली. त्यानंतर तिदमे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेतल्याची तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी बडगुजर यांच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी बडगुजर व तिदमे या दोघांनाही नोटीस बजावत संघटनेचे कार्यालय २४ ऑक्टोबरला सील केले. संघटनेच्या अध्यक्षपद, तसेच कार्यालयासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

एकतर्फी कारवाई?

म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे कार्यालय सील केल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख व संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी पोलिस कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला. सर्वसाधारण सभेत बहुमताने संघटनेचे अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या ठराव इतिवृत्त व इतिवृत्त नोंदवहीची सत्यप्रत आपण महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त तसेच औद्योगिक न्यायालय व कामगार उपायुक्त कार्यालयात सादर केली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com