Vishwas Nangre Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vishwas Nangre Patil : आताच्या Gen-Z ला काही बोलणंही मुश्किल, 'डोक्यात केमिकल लोचा', विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

Vishwas Nangre Patil On Gen-Z : विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतेच जेन झी Gen-Z बाबत एक वक्तव्य केले आहे. जंतर मंतर येथील आंदोलन ताजे असताना त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Ganesh Sonawane

Vishwas Nangre Patil : नीट पेपरफुटीच्या विरोधात Gen-Z ने दिल्लीतील जंतर मंतरवर केलेलं आंदोलन देशभर गाजलं. ३६ दिवस चाललेल्या या आंदोलनाने सरकारलाही झुकायला भाग पाडलं. यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडत Gen-Z ने प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढा दिला. पोलिसांच्या लाठ्या-काठ्या झेलल्या, पण ते वाकले नाही. विरोधकांना जे जमले नाही ती कामगिरी जेन झीने (Gen-Z) करुन दाखवल्याने त्याविषयी चर्चा सुरु असून विविध स्तरावर Gen-Z च कौतुक होत असताना, आता एका कार्यक्रमात बोलताना नागपुरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी झेन झी बद्दल वेगळच मत व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चा रंगली आहे.

जेन झी पिढी सतत मोबाईलवर असते. स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. पण त्यांना काय बोलणार? आताच्या जेन-झीला काही बोलणंही मुश्किल झालंय. वाढलेला स्क्रीन टाईम, सततचे स्क्रोलिंग यामुळे ब्रेन सेकंदागणिक इकडून-तिकडे Jump करत असल्याने, डोक्यात केमिकल लोचा होत असून ते कोणाच्याही लक्षात येत नसल्याचं मत विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते सोमवारी कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी नव्या पिढीबाबत विशेषतः जेन-झी पिढीच्या जीवनशैलीकडे लक्ष वेधलं. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सोशल मीडियावरील अवलंबित्वामुळे तरुणांच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होत असल्याचं ते म्हणाले. मोबाईल, सोशल मीडियाचा वाढता वापर, सततच्या स्क्रीन टाइममुळे अनेक तरुणांची एकाग्रता, सखोल विचार करण्याची क्षमता आणि भावनिक प्रतिक्रिया हाताळण्याची क्षमता कमी होत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

‘जेन-झी’ हीच देशाचे भविष्य आहे, असे सांगताना त्यांनी या पिढीशी संवाद साधण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. मात्र, सध्याच्या काळात या पिढीला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवणे हे अधिक आव्हानात्मक झालं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT