IPS Vishwas Nangre Patil : आचारी बदला म्हणण्याची हिंमत झाली नाही, हीच स्थिती सध्या देशाची! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल, सरकारनेच केला खुलासा

Vishwas Nangre Patil viral post, Maharashtra government clarification : 'डीजीआयपीआर'ची सोशल मीडियातील खुलासा करणारी पोस्ट विश्वास नांगरे पाटील यांनीही शेअर केली आहे.
IPS Vishwas Nange Patil
IPS Vishwas Nange PatilSarkarnama
Published on
Updated on

IPS officer news : महाराष्ट्रातील धडाकेबाज IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रामुख्याने तरूणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांची भाषणे, सोशल मीडियातील पोस्टला अनेकदा प्रचंड प्रतिसाद मिळतो. यापार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये ना अन्य कुणाच्या नावाचा उल्लेख आहे, ना कुणावर थेट टीका आहे. पण कवितेच्या स्वरुपातील ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

भाकरी करपली... असे म्हणते विश्वास नांगरे पाटील यांनी सध्याच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केल्याचा दावा सोशल मीडियातून केला जात आहे. हा दावा खोटा असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विभागाने सोशल मीडियात केलेल्या पोस्टनुसार, याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे DGIPR ने?

भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली, असे म्हणत IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यवस्थेवर भाष्य केल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

IPS Vishwas Nange Patil
PM Modi vs Rahul Gandhi : भाजपच्या 'त्या' विजयात काँग्रेसला दिसू लागला आशेचा किरण; राहुल गांधींच देऊ शकतात PM मोदींना टक्कर?

नांगरे पाटील यांच्या नावावर काय होतेय व्हायरल?

भाकरी करपली. आचारी म्हणाला, 'तवा बदला'! भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला, 'पीठ बदला'! भाकरी तरीही करपलीच. आचारी म्हणाला, 'पाणी बदला'! पुन्हा तेच... भाकरी पुन्हा करपलीच. आचारी म्हणाला, 'चूल बदला'! तरीदेखील परिणाम शून्यूच. भाकरी करपतच राहिली. पण एकाची देखील 'आचारी बदला' म्हणण्याची हिंमत झाली नाही. हीच स्थिती सध्या देशाची झाली आहे.

IPS Vishwas Nange Patil
Top 10 News : राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीचा झटका, दादा नाहीत तर कोणीच दाद देईना; वाचा महत्वाच्या घडामोडी

'डीजीआयपीआर'ची सोशल मीडियातील खुलासा करणारी पोस्ट विश्वास नांगरे पाटील यांनीही शेअर केली आहे. दरम्यान, सोशल मीडियात सध्या अनेक खोटा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. विविध सरकारी योजना, राजकीय नेते, अधिकाऱ्यांची विधाने, छायाचित्रे असलेल्या पोस्टच्या माध्यमातून खोटी माहिती पसरविली जात आहे. 'डीजीआयपीआर'कडून याबाबत सातत्याने खोटे दावे खोडून काढले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com