Vivek Kolhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vivek Kolhe : आमदार काळेंचे गुन्हेगारांना बळ? विवेक कोल्हेंचे पोलिसांसमोर पुराव्यांसह आरोप

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कोपरगावातील वाढत्या गुन्हेगारीवरून युवा नेते विवेक कोल्हे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर हल्ला चढवला. विवेक कोल्हेंनी पोलिस ठाण्यात गुन्हेगारांना आमदार काळेंचे पाठबळ असल्याचे पुरावे दाखवत आरोप केला. यामुळे खळबळ उडाली.

दुसऱ्यांना गाडता गाडता आमदार काळेंनी कोपरगावची कायदा-सुव्यवस्था गाडून टाकल्याचा घणाघात विवेक कोल्हेंनी केला.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारावरून शहरात भीतीचे वातावरण आहे. वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अग्निशस्त्रांची अवैध खरेदी-विक्री, त्यातून गोळीबार, यात युवक-तरुणांचे गुन्हेगारीकडे वाढलेले आकर्षण, यावर चिंता व्यक्त करताना, हे धंदे कुणाचे आणि यामागे आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सर्वपक्षांकडून कोपरगाव शहर पोलिस (Police) ठाण्यात निवेदन देण्यात आले. सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, मनसे पदाधिकारी आणि नागरिकांनी कोपरगाव शहर पोलिसांची भेट घेतली.

'महापुरुषांचे नाव घेऊन किंवा जातीवाचक शिवीगाळ करून वातावरण दूषित करणारे वाळूचोर, आमदारांचे कार्यकर्ते आहेत हे आता समोर येते आहे. दोन वेळा धर्मग्रंथांची विटंबना, धर्म कोणताही, असो त्या धर्मगुरुला मारहाण होणे, समाजात तेढ निर्माण करणे, ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेला परिणाम करणारे आहे. गोरगरीब समाजाला त्रास देऊन त्यांच्या रोजगारावर याचा परिणाम होतो आहे, हे अशा प्रवृत्तींना जोपासणाऱ्या लोकप्रतिनिधीनी लक्षात घ्यावे', असा सल्ला विवेक कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष (Ashutosh Kale) काळे यांचे नाव न घेता दिला.

विवेक कोल्हेंकडून पोलखोल

"कोपरगाव ज्याने गोळीबाराची घटना केली, ज्याने गुन्हा केला, त्याने गुन्हा करण्यापूर्वी आमदार आशुतोष काळे यांचे 'बॉस' म्हणून स्टेटस ठेवले होते. हल्ला झालेल्या युवकाने आमदार आणि त्यांचे स्वीय्य सहाय्यक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडिओ दाखवत पोलिस प्रशासनावर हल्लाबोल केला. विवेक कोल्हेंनी थेट पोलिस ठाण्यात आमदार काळेंचे नाव घेतल्याने खळबळ उडाली. अनेक ठिकाणी रेशन विक्रीसारख्या प्रकारात त्यांचे निकटवर्तीय आहेत. विरोधकांना गाडून टाका म्हणणाऱ्या आमदारांनी कोपरगावची कायदा सुव्यवस्था अक्षरशः 'बॉसगिरी' करून गाडून टाकली," असा घणाघात विवेक कोल्हेंनी केला.

गावपण घालवू नका

कोल्हे साहेब, काळे साहेब यांच्या काळात, असे प्रकार झाले नाहीत. गावपण जपण्यावर या दोघांचा भर राहिला आहे. मात्र या पाच वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी चुकीचे प्रकारांना बळ दिलं, त्यातून गुन्हेगारी वाढली आणि कोपरगावचं विद्रुपीकरण झाल्याची टाकी विवेक कोल्हे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT