Kopargaon politics : देशातील डझनच्या वर मुख्यमंत्री, मंत्री, हजारो आमदार, शेकडो खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाने आपल्या कामाची कौतुक करावं, असे हजारो कार्यकर्त्यांची इच्छा असते. पण त्यातील अनेकांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. परंतु माझी इच्छा पूर्ण झाली.
युवा नेते विवेक कोल्हे यांच्या पुढाकारातून देशातील सहकारी तत्त्वावरली पहिला सीएनजी (CNG) प्रकल्प अहिल्यानगरच्या कोपरगाव इथं सुरू झाला. या प्रकल्पाच्या उद्घाटनाला येतो, असा स्वतः अमित शहा यांनी केलेल्या फोनचा किस्सा स्वतः विवेक कोल्हे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितला.
कोपरगाव इथं देशातील पहिला सहकारी सीएनजी (CNG) प्रकल्प पाच ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते सुरू झाला. हा प्रकल्प सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 50 कोटी रुपये खर्चून उभारला असून, यातून कारखान्याच्या सांडपाण्यापासून आणि डिस्टिलरीतील पदार्थांपासून सीएनजी गॅस तयार केला जाणार आहे. हा कार्यक्रमात सर्वाधिक छाप पडली ती विवेक कोल्हे यांची!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विवेक कोल्हे यांचं कौतुक केलं. विधानसभा निवडणुकीला महायुतीच्या केलेल्या कामाचंही कौतुक झालं. याशिवाय राजकीय पुर्नवसनावर सूचक भाष्य झालं. तेव्हापासून अहिल्यानगरच्या राजकारणात विवेक कोल्हे आणि त्यांचा परिवार चर्चेत आला आहे. अमित शहा यांच्याशी राजकीय भेट, अन् स्वतः हून कार्यक्रमाला येण्याचं दिलेला मेसेज, सर्व दुर्मिळच!पण विवेक कोल्हे यासर्वांसाठी अपवाद ठरले.
कोपरगाव इथल्या कार्यक्रमाला अमित शहा यांना निमंत्रण दिलं होतं. पण ते येतीलच, याची खात्री नव्हती. पण थेट अमित शहा यांच्या कार्यालयातून फोन आला, मै आ राहा हूं, कार्यक्रम की, तयारी करों, अशी सूचना विवेक कोल्हे यांना मिळाली. अशा नेत्यानं येत आपण सुरू केलेल्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं, ही आपल्या मेहनतीवर यशाची उमटलेली मोहोर आहे, असे विवेक कोल्हे यांनी म्हटलं.
अमित शहा यांनी कार्यक्रमात खूप कौतुक केलं. पण त्याचबरोबर जबाबदारी देखील देऊन गेले, असे सांगताना, अमित शहा यांच्या व्यक्तिमत्त्वावर विवेक कोल्हे म्हणाले, "देशाचं आज नेतृत्व करणारा एक नेता आहे. आज त्यांच्या अंडर पक्षाच्या माध्यमातून डझनभर पेक्षाही जास्त मुख्यमंत्री आहेत, हजारो आमदार आहे, शेकडो खासदार आहेत, अनेक मंत्री आहेत आणि अशा नेतृत्वाने आपल्या कामाची कौतुक करावं, कौतुकाची थाप द्यावी, यामुळे एक छोटासा सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितच उर्जा आणि बळकटी येते."
छोट्या कार्यकर्त्याची अमित शहा वैयक्तिक ओळख ठेवतात, यावर बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, "हो, कारण की, मी वेगवेगळ्या माध्यमातून पूर्वी, ज्यावेळेस ताईंबरोबर (स्नेहलता कोल्हे) यांच्या माध्यमातून भेटलो, त्यावेळेस चर्चा झाली होती. त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मुळातच चाणक्ष असल्यामुळे त्यांनी सहकार तत्त्वावरील सगळ्या प्रस्तावाची माहिती देखील घेतली."
'ज्यावेळी आम्ही गेलो, सीएनजीचा सहकार तत्त्वावरील प्रकल्पाचे आमंत्रण घेऊन, त्यावेळी तो समजून घेतलाच, तसंच त्यांच्याही लक्षात आलं की, भारतातील हा पहिला प्रकल्प आहे, ज्यात आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, सगळ्या गोष्टी आल्या. त्यांनी लगेचच सांगितलं की, 'मै आऊंगा, आप चिंता मत करो'. यानंतर थेट ऑफिसमधून फोन आला की या तारखेला कार्यक्रम घ्यायचा आणि अमित शहा कोपरगावात आले अन् वेगळच वातावरण निर्माण करून गेले,' असे विवेक कोल्हे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.