Saroj Ahire & Devyani Pharande
Saroj Ahire & Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Marathwada Water: देवयानी फरांदे, सरोज अहिरे सरसावल्या, सर्व आमदारांचे मात्र मौन!

Sampat Devgire

Maharashtra Politics : नाशिक, नगर जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडीला पाणी सोडण्याचा तापला आहे. मात्र, जिल्ह्यातील १५ पैकी तेरा आमदार सत्ताधारी असताना, या विषयावर केवळ भाजपच्या देवयानी फरांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) यांनी या प्रश्नावर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. (Most of the MLAs keep Quite on serious political issue of Water to Jaikwadi Dam)

मराठवाड्याला सो़डण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रश्न (Water) नेहेमीप्रमाणे वादाचा विषय बनला आहे. जायकवाडी धरणासाठी नाशिकहून (Nashik) पाणी सोडण्यावर सत्ताधारी भाजप (BJP) व राष्ट्रवादीच्या (अजित पवार) (NCP) गटाच्या दोन महिला आमदारांनी विरोध केला आहे.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्यास विरोध दर्शवणारे पत्र लिहिले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गट सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन विरोध पाणी सोडण्यास विरोध केला आहे. त्यामुळे या गंभीर विषयावर या दोन महिला आमदार त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत.

नाशिक जिल्ह्यात १५ आमदार आहेत. यामध्ये हिरामण खोसकर (इगतपूरी) आणि मौलाना मुफ्ती (मालेगाव) हे विरोधात राहिले आहेत. उर्वरित सर्व तेरा आमदार भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांचे आहेत.

राज्य शासनाने समन्यायी पाणीवाटप धोरणांतर्गत मराठवाड्यात टंचाई असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि नगर येथे देखील यंदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र टंचाई होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नगरच्या विविध आमदारांनी त्यावर विरोधाची भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये मात्र तसे काहीही होताना दिसलेले नाही.

भविष्यात हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. या विषयावर नगर जिल्ह्यात नेत्यांमध्ये या विषयावरील वाद चांगलाच रंगला होता. नाशिकमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सरोज अहिरे यादेखील मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने सरकारला या विषयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे.

मेंढीगिरी अहवालाचे पुनर्विलोकन दर पाच वर्षांनी करणे गरजेचे आहे. तथापि २०१३ पासून पुनर्विलोकन झालेले नाही. गंगापूर प्रकल्पातून नाशिक महापालिकेच्या अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमधून तळातील ६०० दलघफू पाणी हे गाळ तसेच जॅकवेलपर्यंत पोच कालव्याचे काम न झाल्याने ते उपयोगात येत नाही. त्यामुळे सुमारे ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश स्थगित करावेत, अशी मागणी या दोन्ही आमदारांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT