Gayakar thorat and vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe and Thorat : '' विखे-थोरातांची अडचण होईल, पण संघर्ष अटळ!'' अजित पवार गटाचे नेते सीताराम गायकर यांचे विधान

Mayur Ratnaparkhe

प्रदीप पेंढारे -

Water release to Jayakwadi and Negar Politics : ''महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे प्रमुख नेते आहेत. पक्ष सत्तेत असल्यावर सरकारमध्ये ते प्रमुख भूमिका बजावत असतात. मात्र असे असूनही नगरवर अन्याय होत असलेल्या समन्यायी पाणी वाटपाबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. यासाठी आमचा संघर्ष सुरू झाला असून यामध्ये या नेत्यांची अडचण होणार आहे.''

''मात्र असे असले तरी जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.'' असे अकोले तालुक्यातील अगस्ती कारखान्याचे चेअरमन तथा अजित पवार गटाचे नेते सीताराम गायकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काढला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आणि पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त हवा आहे. यावर कधीही कार्यवाही होऊ शकते. परंतु जायकवाडीला पाणी सोडण्यावरून राजकीय संघर्ष पेटला आहे.

माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आज नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासे येथे रास्ता रोको आंदोलन केले. आमदार आशुतोष काळे यांनी न्यायालयीन लढा उभारला आहे. अकोले, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आणि राजकीय नेते या आदेशाविरोधात मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. यावर अकोले तालुक्यातील अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर यांनी आपली भूमिका सरकारनामाशी बोलताना मांडली.

सीताराम गायकर म्हणाले, "समन्यायी पाणी वाटपाचा फेरविचार झालाच पाहिजे. यासाठी आम्ही हा कायदा तयार झाल्यापासून शासन दरबारी प्रयत्न करत आहोत. परंतु यातून सामाजिक प्रश्न निर्माण होतो. पाणी सर्वांचेच आहे. ते सर्वांना मिळालाचे पाहिजे. यामुळे शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याचा फायदा होत नाही. असे असले, तरी या कायद्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अनेक पेचप्रसंग तयार होतात. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही".

...तर परिस्थिती अधिकच भयानक होईल. -

''संगमनेर, अकोले, श्रीरामपूर तालुक्याला पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने ही धरणे तयार झाली आहेत. यंदाचा दुष्काळ तीव्र आहे. नगरच्या धरणातून जायकवाडीला आता पाणी देणे म्हणजे हे नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, श्रीरामपूर हे तालुका उद्धवस्त करण्यासारखे होईल. अकोले तालुका परिसरात दरवर्षी पाच लाख टन ऊसाचे उत्पन्न होते.

यंदा दुष्काळामुळे ऊस उत्पन्न घटले आहे. ते दोन लाख टन सुद्धा झालेले नाही. संगमनेर कारखाना परिसराची देखील हीच परिस्थिती आहे. यात जायकवाडीला पाणी सोडल्यास परिस्थिती अधिकच भयानक होईल.'', असे सीताराम गायकर यांनी म्हटले आहे.

दुष्काळात नगरमधून जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे... -

''मुळा धरण राहुरीला झाले. पण अकोले, संगमनेर येथे आता एक पाझर तलाव लवकर होईना. या दुष्काळात नगरमधून जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे, 'धरण उशाला कोरड घशाला', अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे समन्यायी वाटपाचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे.

कोकणात जाणारे पाणी अडवल्यास त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी काही उपाययोजना करता येतील, हे सरकार पातळीवर पाहणे गरजेचे आहे. कोकणात जाणारे पाणी अडवल्यास, त्या पाण्यातून बरच काही करता येईल. यावर शासनाने कार्यवाही करावी.'', असेही सीताराम गायकर म्हणाले.

...त्या दोन टीएमसी पाण्याचा हिशोब कोण देणार? -

याचबरोबर 'नगरमधून जायकवाडीला सोडण्यात येणार्‍या पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी होते. यावर तोडगा निघालाच पाहिजे. पाणी सोडण्याच्या निर्णयावर फेरविचार झालाच पाहिजे. सहा टीएमसी पाणी सोडल्यानंतर चार टीएमसी उरते. यात काय होणार? वाया गेलेल्याा दोन टीएमसी पाण्याचा हिशोब कोण देणार? जायकवाडीत पुष्कळ पाणी आहे. यातील पाणी ते शेतीसाठीच खाली सोडतात. नगरमधून जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे, नगरमधील शेतकर्‍यांची शेती उद्धवस्त करण्यासारखे आहे', अशा शब्दांत सीताराम गायकर यांनी मत मांडले आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT