Indapur News : ''चुलीत गेले नेते... चुलीत गेले पक्ष...आता फक्त मराठा आरक्षणावरती लक्ष...'' असे म्हणत आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे. मराठ्यांच्या ताकदीची वज्रमूठ गावोगावी दिसू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. याशिवाय तालुक्यातील राजकीय कार्यक्रमही ठप्प झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जाहीर सभा घेतली होती. सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती. सभेनंतर जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी राज्यामध्ये मराठा समाजाच्या नागरिकांनी गावोगावी आंदोलने करून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये १४४ गावे असून, तालुक्यातील सुमारे ७० पेक्षा अधिक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी प्रवेश बंदी आहे. तसेच गावोगावी युवक साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक गावामध्ये कँडल मार्च निघाले असून, कँडल मार्चला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.
तालुक्यासह राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक गावांमध्ये गावबंदी असल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम ठप्प झाले आहेत.
उद्घघाटने, भूमिपूजनाचे कार्यक्रम बंद झाले असून राजकीय पुढाऱ्यांच्या सांत्वन भेटी ही बंद केल्या आहेत. प्रमुख राजकीय पुढाऱ्यांनी गावामध्ये फिरणे बंद केले आहे, तर अनेक पुढारी सध्या नॉट रिचेबल आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून, येणाऱ्या काळामध्ये याचा निवडणुकीवर निश्चितच परिणाम होईल, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे.
पूर्वीची आंदोलने गावातील मुख्य चौकामध्ये पाहावयास मिळत होती. मात्र, सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेली आंदोलने वाड्यावस्तीपर्यंत पोहाेचली आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत. गावोगावी कँडल मार्च निघत असून, महिलांचा सहभाग वाढला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.