Manisha Khatri Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manisha Khatri : नाशिकच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी जुन्या आयुक्तांना कोणता सूचक इशारा दिला?

Nashik Corporation Commissioner : मावळते आयुक्त आणि सध्या वैद्यकीय रजेवर असलेले अशोक करंजकर यांच्या कामकाजाविषयी लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या काही निर्णयांविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चाही काढला होता. त्या संदर्भात राज्य सरकारवर टीका होत होती.

Sampat Devgire

Nashik NMC News : नाशिक महापालिकेचे मावळते आयुक्त अशोक करंजकर सातत्याने वादाचे केंद्र राहिले. ते सध्या वैद्यकीय रजेवर आहेत, त्या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्त म्हणून मनीषा खत्री यांनी आज पदभार स्वीकारला. महापालिकेच्या प्रशासनातील साफसफाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाशिक (Nashik) महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी भविष्यात कोणत्या पद्धतीने काम करणार, याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.

आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अन्य सर्वांचे मार्गदर्शन घेऊन काम करू. महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांचाही फीडबॅक घेतला जाईल. कामाची गती वाढविण्यावर आपला भर असेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकर आणि महापालिकेच्या समन्वयावर भर असल्याचे संकेत मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिले.

मावळते आयुक्त आणि सध्या वैद्यकीय रजेवर असलेले अशोक करंजकर यांच्या कामकाजाविषयी लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या काही निर्णयांविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चादेखील काढला होता. त्या संदर्भात राज्य सरकारवरही टीका होत होती.

याबाबत आयुक्त खत्री म्हणाल्या, महापालिकेच्या भूसंपादन प्रकरणात जे काही घडले असेल त्याचे मी गांभीर्याने माहिती घेईल. त्याबाबत काय काय प्रकार झाले याची माहिती सरकारला कळविण्यात येईल. कोणताही इगो ठेवून काम करणार नाही. जिल्हाधिकारी असो व अन्य अधिकारी सगळ्यांशी समन्वय ठेवेल.

शहरात स्वच्छ पाणी, लसीकरण, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यावर भर देणार असल्याचे नव्या आयुक्तांनी सांगितले. मागील काळात सुरू केलेली कामे पुढे घेऊन जाऊ. निधीची कमतरता बघून एक एक काम सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्या संदर्भात प्रत्येक विभागाला सूचना दिल्या आहेत. सुरू असलेले आणि प्रस्तावित अशा सर्व प्रकल्पांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

नाशिक शहर इंदोर शहरापेक्षाही अधिक चांगले करण्याचे काम मला करायचे आहे. या संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील, चौकशीबद्दल वरिष्ठ अधिकारी जे सांगतील, तसे काम केले जाईल. यापुढे उत्तम काम करण्याची आपली मनीषा आहे. मला जी संधी मिळाली आहे, त्यानुसार नाशिक महापालिकेत चांगले काम करण्यावर भर देण्यात येईल, असेही आयुक्त खत्री यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा नाशिक शहरात होणार आहे. त्या दृष्टीने मूलभूत कामांच्या विषयांना संबंधितांशी चर्चा करून प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात नाशिक शहरात सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सिंहस्थ कुंभमेळ्याचा चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडे उत्तम कल्पनादेखील आहेत, त्या कल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT