Nashik NCP Farmer Gathering Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : मेळावा राष्ट्रवादी पक्षाचा; पण पहिल्या स्थानी फोटो झळकला शिंदे गटातील मंत्र्याचा !

Nashik NCP Farmers Gathering : मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कृषी धोरणांवर टीका

सरकारनामा ब्युरो

NCP and Dada Bhuse : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वातावरण निर्मितीसाठी विभागानिहाय वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची पहिली सभा २ एप्रिल रोजी मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नियोजित आहे. तत्पुर्वी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा पार पडला. त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याआधी शिवसेनेच्या (शिंदे गट) एका मंत्र्याचा फोटो झळकल्याचे दिसून आले. यामुळे राज्यभर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा फोटो झळकला. त्यामुळे हा मेळाव्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या शेतकरी मेळाव्याच्या मागच्या बाजूला लावण्यात आलेल्या 'एलईडी वॉल'वर दादा भुसे यांचा फोटो पहायला मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या प्रॉटोकलमध्ये दादा भुसे यांचा फोटो पहिल्या स्थानावर होता. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या काय सुरू आहे, अशा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शेतकरी मेळाव्याचे आयोजन माणिकराव कोकाटे यांनी केले होते. त्यांनी याच मेळाव्यात दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर जोरदार टीका केल्याचेही पहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्षाच्या इतर नेत्यांनीही कांद्याचा बाजारभाव, अवाकाळी पाऊस, पंचनामे, शेतकऱ्यांना भरपाई आदी मुद्यांसह सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली. असे असतानाही या मेळाव्यातील 'एलईडी वॉल'वर दादा भुसे यांचा फोटो अगदी पहिल्या स्थानी झळकल्याचे दिसून आले. यामुळे नाशकाच्या (Nashik) राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT