Karnataka Politics : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यातील काँग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. असे असतानाच भाजपच्या एका आमदाराने तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे आमदार गोपाळकृष्ण यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. त्यांनी राजीनामा का दिला? याबाबत त्यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
मात्र, काही दिवसांपूर्वी कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांची त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते आता पुढील भूमीका काय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होत आहेत. यासाठी कर्नाटकात 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या कर्नाटक राजकारण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.