Delhi Politics: केजरीवालांना गुजरात न्यायालयाचा झटका; 25 हजारांचा ठोठावला दंड, 'हे' आहे कारण

पंतप्रधानांबाबत मागवेलेल्या माहितीनंतर गुजरात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दंड ठोठावला आहे.
CM Arvind Kejariwal
CM Arvind KejariwalSarkarnama

Arvind Kejariwal : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीरेन वैष्णव यांनी हा निर्णय़ दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितल्या प्रकरणी त्यांना हा दंड ठोठावला असून पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांची डीग्री देण्याची गरज नाही, असंही सांगितलं आहे. (Gujarat court has imposed a fine of 25 thousand on Arvind Kejriwal)

गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात मुख्य माहिती आयुक्तांनी 2016 ला पंतप्रधान कार्यालय तसंच गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाला मोदी यांच्या पदव्यांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. हे आदेशही न्यायालयाने रद्द केले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर केजरीवाल (Arvind kejariwal) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

CM Arvind Kejariwal
Pune Crime: लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे..: गणेश बिडकरांना धमकी

देशातील जनतेला आपला पंतप्रधान किती शिकलेले आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का? न्यायालयाने त्यांची डिग्री दाखवण्यास तीव्र विरोध केला आहे. पण का, असं विचारत पंतप्रधानांच्या डिग्रीची मागणी करणाऱ्यांना शिक्षा का दिली जातेय? देशात काय चाललंय? असे ट्विट करत केजरीवालांनी केंद्र सरकारवर प्रश्न विचारत धारेवर धरलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी गुजरात विद्यापीठातून 1978 मध्ये पदवी आणि 1983 मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी विद्यापीठातर्फे हजर राहून असा युक्तिवाद केला होता की लपवण्यासारखे काही नाही, त्यामुळे विद्यापीठाला माहिती उघड करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. असंही मेहतांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com