sharad pawara nilesh lanke sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : खासदार लंके यांचा विश्वास पाहा; 'नगर जिल्ह्यात पवारसाहेबांचे 12 आमदार असतील...'

Nilesh Lanke On Ahmednagar : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. नगर जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण टच आहे. त्यामुळे नगर राष्ट्रवादीला वर्धापनदिन साजरा करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे, असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.

Pradeep Pendhare

Ahmednagar NCP Sharad Pawar news : नगरमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अध्यक्ष शरद पवारसाहेब आज वर्धापनदिनानिमित्ताने विधानसभेचा नारळ फोडत असतात. नगर जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघात शरद पवार पक्षाचे आमदार असतील, असे मोठे विधान खासदार नीलेश लंके यांनी केले आहे. राज्यातून वर्धापनदिनाला 25 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार असून, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असेही खासदार लंके यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे साजरा होत आहे. या पक्षाच्या सरचिटणीस आदिती नलावडे व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या हस्ते सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता कायनेटीक चौकातील (पुणे रस्ता) राष्ट्रवादी भवनात झेंडावंदन करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अध्यक्षस्थानी होते.

खासदार नीलेश लंके यांच्यासह संदीप वर्पे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नामदेव पवार, प्रा. सीताराम काकडे, अशोक बाबर, किसनराव लोटके उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नगर येथील राष्ट्रवादी भवन येथे झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादीचे दोन वर्धापनदिन साजरे होत आहे. यावर खासदार लंके यांनी मोठे भाष्य केले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी पक्ष हा शहरी आणि ग्रामीण भागाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. जरी दोन वर्धापनदिन साजरे होत असले तरी, राजकारणात काही गोष्टी पचवण्याची तयारी ठेवावी लागते. जगन्नाथाचा रथ ओढायचा असतो". राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे व अहमदनगर जिल्ह्यात 12 आमदार महाविकास आघाडीचेच येतील, असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला.

तसेच, 'तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. हा वर्धापनदिन राज्यात बदल घडविणारा असणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. नगर जिल्हा शहरी आणि ग्रामीण टच असलेला आहे. संमिश्र असल्याने, त्याचबरोबर ही नगर राष्ट्रवादीला संधी मिळाल्याने आम्हाला आनंद आहे', असेही खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT