Sujay vikhe : घायल शेर की साँसे उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है! सुजय विखेंची 2029 ला पुन्हा येणारची घोषणा...

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : भाजपच्या सुजय विखे यांच्या या निर्धारामुळे नगर दक्षिणमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्याशी पुढचा पाच वर्षे संघर्षाची असणार असे संकेत मिळाले आहेत.
sujay vikhe
sujay vikhesarkarnama

Ahmednagar Lok Sabha Result : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा डायलाॅग माहित आहे का? मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल..! भाजपचे सुजय विखे यांनी पराभवावर खचून न जाता कार्यकर्त्यांनी संवाद साधताना फडणवीस यांच्या स्टाईलमध्ये 'मी 2029 पुन्हा येणार', असे सांगून नगर दक्षिणेत तळ ठोकून राहणार असल्याचे सांगितले. सुजय विखे यांच्या या निर्धारावर कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात एकच घोषणाबाजी झाली. तसेच पारनेरची घटनेवर गंभीर दखल घेत यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत, असा देखील विखे यांनी इशारा दिला.

भाजपच्या (BJP) सुजय विखे यांच्या या निर्धारामुळे नगर दक्षिणमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्याशी पुढचा पाच वर्षे संघर्ष कायम राहणार, असे संकेत मिळाले. कार्यकर्त्यांनी संवाद साधताना सुजय विखे यांनी त्यांच्यात जोश भरला. पराभव झाला असला, तरी खचू नका. आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवू नका. गावपातळीवर काम सुरू करा. अन्याय होईल तिथे मी खंबीरपणे उभा आहे, असे म्हणत सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले.

विधानसभा (Assembly) आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यासाठी कामाला लागा. महायुतीची ताकद विधानसभेत दाखवून देऊ. लोकसभा निवडणुकीत बूथ निहाय मिळालेल्या मतांचा आढावा घेण्यासाठी लवकरच तालुकानिहाय दौरा सुरू करत आहे. हा दौरा थेट कार्यकर्त्यांच्या घरापासून सुरू होईल, असे सुजय विखे यांनी सांगून लोकसभा मतदारसंघात विधानसभेची बांधणी करणार असल्याचे दिसते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे या संवाद सभेला लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sujay vikhe
Sharad Pawar And Nilesh Lanke : शरद पवार जाम खूष; आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं...

सुजय विखे म्हणाले, "निवडणूक (Election) निकालाच्या विश्लेषणात न जाता आता पुन्हा नव्याने आपल्याला काम गरजेचे आहे. निवडणुकीतील पराभवाची कारणे खूप वेगळी आहेत. पण तरीही सहा लाखांचे मतदान देवून जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवला. यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे".आम्ही पराभव स्वीकारलाय पण, समोरच्यांना विजय पचवता येत नाही. पारनेरची घटना पाहाता आता, यापुढे कोणाही कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला.

केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. विकास कामांना मोठी मदत होणार आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महिनाभरात सुरू होईल, आपण जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्ततेसाठी आपण कटिबध्द आहोत, असे सांगून कुठेही कमी पडणार नाही, याची ग्वाही सुजय विखे यांनी दिली. तसेच कोणी काही चर्चा केल्यातरी 2029 चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.

sujay vikhe
Controversy in Ahmednagar BJP : देवेंद्र फडणवीसांचं 'नॅरेटिव्ह'वर भाष्य; काही वेळातच भाजपमध्ये ठिणगी अन् हकालपट्टीची मागणी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com