Amrita Pawar
Amrita Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yewla News : आरक्षणासाठी भुजबळांचे दौरे राज्यात अन् संधी साधत भाजप नेत्या अमृता पवार येवल्यात!

Sampat Devgire

Nashik News : नाशिकमधील शेती, शेतकऱ्यांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघ येवला, लासलगाव भागात तर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी भुजबळ हे एल्गार सभांनिमित्त राज्य दौऱ्यावर असताना आता भाजपच्या नेत्या अमृता पवार यांनी येवल्यात थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली.

सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. मंत्री भुजबळ आणि मनोज जरांगे यांनी राज्यभरात सभांचा धडका सुरू केला आहे. दोन्ही नेते आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाले असून, सभांमधून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर भुजबळ राज्यभरात एल्गार सभा घेत असताना, दुसरीकडे त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी भाजप नेत्या अमृता पवार यांनी संधी साधत, रोज भुजबळांच्या येवला मतदारसंघाचे दौरे सुरू केल्याचे दिसत आहे.

अवकाळी पावसाने नाशिकचे मोठे नुकसान केले आहे. दुष्काळाने अगोदरच सामान्य शेतकरी संपला असताना, आता या अवकाळी पावसाच्या तडाख्याने उरलासुरला बागायतदार शेतकरीही संकटात सापडला आहे. हे नुकसान भरून न येण्यासारखे आहे. त्यामुळे विविध भागांतील दौरे करून भाजप नेत्या पवार यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

शिवाय बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूसही केली. एवढच नाहीतर याबाबत तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांना माहिती देत, तातडीची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपा नेत्या अमृता पवार म्हणाल्या, ''नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आज सोमठाण देश आणि परिसरात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अनेक फळबागा, द्राक्षबागा, मका, कांदा पीक भुईसपाट झाले आहे. शेतकरी चंद्रभान पिंपळे, जगन्नाथ ढगे यांच्या द्राक्ष बागांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कांदा, मका, गहू यांच्यासह जनावरांच्या चाऱ्याचेदेखील प्रचंड नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.''

याशिवाय, ''येवल्याचे तहसीलदार महाजन यांची भेट घेऊन त्वरित पिकांचे पंचनामे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,'' असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT