NCP News : ...म्हणून मावळात राष्ट्रवादीला पाच महिन्यांपासून अध्यक्षच नाही!

Maval News : भाजपने मात्र मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर करून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
NCP News
NCP NewsSarkarnama

Pimpari News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटून पाच महिने झाले. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अद्याप शरद पवार गटाला अध्यक्षच मिळालेला नाही. कारण मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके व बहुतांश पदाधिकारी हे अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवार गटाने या ठिकाणी अद्याप अध्यक्ष जाहीर केला नसल्याचे दिसत आहे.

दोन जुलैला राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी गणेश खांडगे कायम राहिले आहेत. त्यांच्यासह बहुतांश स्थानिक पदाधिकारी आणि पक्ष हा अजित गटाबरोबर राहिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP News
Sanjay Raut : पिंपरीत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्याचे शिवधनुष्य राऊतांना पेलणार का?

तर ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना यांनी मात्र शरद पवारांची साथ सोडलेली नाही. सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) मावळ तालुका अध्यक्षाची निवड लांबली. परंतु, येत्या आठ दिवसांत तो जाहीर केला जाईल, असे त्यांनी 'सरकारनामा'ला आज सांगितले. त्याचवेळी शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग मावळात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे तालुका कार्यकारिणी सोमवारी जाहीर करून भाजपने लोकसभेची निवडणूक तयारी जोरात सुरू केली आहे. मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर २४ सप्टेंबरला दत्तात्रेय तथा भाऊसाहेब गुंड यांची नेमणूक झाली. त्यानंतर दोन महिन्याने त्यांनी आपली ५७ जणांची पहिल्या टप्प्यातील जंबो कार्यकारिणी सोमवारी जाहीर केली.

NCP News
Abhijit Patil : मोठी बातमी ! शरद पवारांनी अभिजित पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते. भाजपच्या मावळ तालुक्याच्या नव्या कार्यकारिणीत सहा सरचिटणीस, १५ उपाध्यक्ष, १४ चिटणीस आणि २१ विविध मोर्चा तसेच आघाडी अध्यक्ष आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com