Devidas Pingle with Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NDCC Bank of Nashik: जिल्हा बँक वाचविण्यासाठी अजित पवार भूमिका घेतील का?

Sampat Devgire

NDCC Bank News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. ही बँक अद्यापही अडचणीतच आहे. अशा स्थितीत बँकेला पुर्नवैभव प्राप्त करण्यासाठी अजित पवार कोणती भूमिका घेतील याची उत्सुकता आहे. (Will Dy. CM Ajit Pawar take a positive role for Nashik`s DCC Bank)

याबाबत माजी खासदार देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. जिल्हा बँक (Nashik) पुनर्जीवित करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करा, अशी मागणी पिंगळे यांनी केली आहे.

जिल्हा बँकेचा कर्ज वसुलीअभावी एनपीए वाढल्याचा अहवाल ‘नाबार्ड’ने २०१६ मध्येच दिला आहे. ३० फेब्रुवारी २०१७ ला जिल्हा बँकेवर बरखास्तीची कारवाईची वेळ आली होती. नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाणारी बँक वाचविण्यासाठी माजी खासदार पिंगळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजची परिस्थिती सांगत दोन हजार कोटी रुपयांचे शासनाकडून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्याची मागणी पर निवेदन दिले. या वेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे आदी उपस्थित होते.

या जिल्हा बँकेला ६८ वर्षांची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जात होती. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिल्ह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केले आहे.

प्राथमिक, विविध कार्यकारी, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने अशा अनेक सहकारी संस्था उभारणीत मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सभासद, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेती व शेतीपूरक कामासाठी या बँकेने अर्थसहाय्य देऊन मोठे योगदान दिले आहे.

आजची परिस्थिती बघता शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यास लागलीच कर्ज उपलब्ध होत नाही. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तीन महिन्यांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लायसन्स रद्द करेल. यामुळे शासनाच्या माध्यमातून बँक वाचविण्याची गरज आहे.

- देवीदास पिंगळे, माजी खासदार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT