Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता भाजप हिसकावणार का?

Sampat Devgire

नंदुरबार : जिल्हा परिषद (Nandurbar) अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आज निवडणूक (Election) होत आहे. सध्याच्या अडीच वर्षात काँग्रेस, (Congress) शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) आघाडीची सत्ता होती. मात्र सत्ताधारी सत्ता राखण्यात यशस्वी होतात की पुढील अडीच वर्षासाठी भाजप (BJP) जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोचली आहे. (Nandurbar ZP president election is a big challange for BJP or mahavikas front)

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी निवड प्रक्रिया पार पाडणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २३ तर शिवसेनेचे आठ आणि राष्ट्रवादीचे चार व भाजपचे २० असे संख्याबळ आहे. त्यात मागील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीच्या राज्यातील फॉर्मुला वापरून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन झाली होती.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले होते. मात्र सध्या राज्यात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांची सत्ता आहे. पुढील अडीच वर्षासाठी ही सत्ताधारी महाविकास आघाडीने तोच फॉर्मुला कायम ठेवण्याचे लेखी करार केला होता. त्यामुळे सत्ताधारी त्या फॉर्मुलानुसार पुढील अडीच वर्षासाठी सत्ता स्थापन करण्याच्या विचारात असताना भाजपकडूनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत सत्ता काबीज करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.

सत्ता स्थापनेसाठी २९ मॅजिक फिगर

भाजपकडे सध्या वीस सदस्य संख्या आहे. सत्ता स्थापनेसाठी किमान २९ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यामुळे भाजप नऊ सदस्यांची जुळवाजुळव जुडवा कशी करते हा संशोधनाचा भाग आहे. मात्र भाजप अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT