‘दूध का दूध और‌ पानी का पानी’ व्हायलाच हवे!

जिल्हा दूध संघातील लोणी व दूध भुकटीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी वातावरण तापले आहे.
Eknath Khadse & Mangesh Chavan
Eknath Khadse & Mangesh ChavanSarkarnama

सचिन जोशी

जळगाव : जिल्हा दूध संघातील (Jalgaon Milk fedration) लोणी (Butter) व दूध भुकटीच्या (Milk Powder) कथित गैरव्यवहारप्रकरणी (malfeasance) वातावरण तापले आहे. या कोट्यवधींच्या घोटाळ्यात गुन्हा नोंदविण्यासाठी एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांच्यासारख्या नेत्याला पोलिस ठाण्याबाहेर रात्र काढावी लागते, तर पक्ष सत्तेत असूनही आमदार मंगेश चव्हाणांना (Mangesh Chavan) आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो. आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान दिले जात असताना दूध संघातील दूध या गैरव्यवहाराने खरेच ‘नासले’ असेल तर या प्रकरणी ‘दूध का दूध और‌ पानी का पानी’ व्हायलाच हवे. (Milk fedration politics is being a high voltage drama)

Eknath Khadse & Mangesh Chavan
गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे!

एकेकाळी वैभव असलेला जळगाव जिल्हा दूध संघ दरम्यानच्या काळात राजकारण्यांसाठी ‘कुरण’ बनल्यानंतर तो डबघाईस गेला. बंद पडण्याच्या स्थितीत असताना अनेक प्रयत्नांनी तो एनडीडीबीने चालवायला घेतला. तिथून कसाबसा वाचला. २०१५ मध्ये एनडीडीबीचे प्रशासन बाजूला होऊन दूध संघाची निवडणूक होऊन पुन्हा संचालक मंडळाचे त्यावर वर्चस्व आले. गेल्या सात वर्षांपासून तो अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय संचालकांच्या आधिपत्याखाली वाटचाल करतोय.

Eknath Khadse & Mangesh Chavan
अंधेरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपशी चर्चा करा ; सरनाईकांची मुख्यमंत्र्यांना विनंती

या सात-साडेसात वर्षांत दूध संघात आधुनिक यंत्रणेसह त्याची क्षमता वाढली आणि जिल्ह्यातील दूध उत्पादक व पर्यायाने शेतकऱ्यांसाठी तो पुन्हा चांगला आधार बनल्याचे चित्र निर्माण झाले. हा दावा अध्यक्ष व संचालकांकडून केला जातोय. दुसरीकडे, दूध संघातील नोकरभरती असो की, आणखी काही अन्य बाबी त्या संदर्भात संचालकांवर विशेषत: अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यावर विविध स्वरूपाचे आरोप झाले.

राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकाच रात्रीतून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ त्यावर नियुक्त झाले. सोबतच दूध संघातील चौकशीचे आदेशही सहकार विभागाने काढले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात या प्रशासक मंडळाने मध्यरात्रीच दूध संघाचा ताबा घेतला. अर्थातच दूध संघातील या अचानक घडलेल्या घडामोडींमागे राजकीय डाव असल्याचे समोर आले. कारण प्रशासकीय मंडळ नियुक्तीचा निर्णय उच्च न्यायालयात टिकला नाही व शासनाचा हा आदेश रद्द करत संचालक मंडळ कायम करण्याचा निर्णय खंडपीठाने दिला.

स्वाभाविक या नाट्यामुळे दूध संघातील राजकीय वातावरण तापले. दूध संघाच्या निमित्ताने चव्हाण विरुद्ध खडसे असा नवा संघर्ष सुरू झाला. सध्या दूध संघातील लोणी व दूध भुकटीचे वितरण, त्याची रजिस्टरला नसलेली नोंद व त्यातून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण गाजतेय. या प्रकरणी अचानक १२ ऑक्टोबरला अध्यक्षा खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी लोणी, दूध भुकटीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासह पोलिसांत तक्रार दाखल केली. एकनाथ खडसे यांनी गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात व ठाण्याबाहेर रात्रभर ठिय्या दिला, तर दुसरीकडे आमदार चव्हाण यांनी आपण आधीच याबाबत तक्रार दिल्याचा गौप्यस्फोट करत गुन्हा नोंदविण्याचा आग्रह तर धरलाच, शिवाय अध्यक्षा व एमडी यांनीच हा गैरव्यवहार केल्याचा आरोपही केला.

या घटनाक्रमातून दूध संघ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. खरेतर जळगाव जिल्हा दूध संघाचे कधीकाळी खूप मोठे वैभव होते. दुर्दैवाने तोदेखील राजकारण्यांचा अड्डा झाल्याने बंद पडण्याची वेळ आली होती. त्यातून तो सावरला असेल व नंतरच्या काळात चांगली वाटचाल करत असेल तर पुन्हा त्यात राजकारण येऊ नये, केवळ राजकीय वर्चस्वातून हा मोठा प्रकल्प बंद पडू नये, अशी अपेक्षा आहे. मात्र, तेवढा समंजसपणा सध्याच्या राजकीय व्यवस्थेत नाहीच. ही मोठी संस्था आपल्या ताब्यात कशी राहील, त्यातून आपलाच ‘विकास’ कसा होईल, यासाठी या कुरघोड्या होतात, हे अधोरेखित होते. या प्रकरणी दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे होत असताना दूध संघातील दूध नासले असेलच तर शासनाने एकदा त्याची चौकशी करून ‘दूध का दूध...’ करूनच टाकावे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com