गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे!

जळगाव येथे झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिंदे गटाला आव्हान दिले.
Shivsena leader Sanjay Sawant
Shivsena leader Sanjay SawantSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : शिवसेनेशी (Shivsena) दगाफटका करून गेलेले गद्दार (Traitor) नेते आहेत. मात्र, मूळ शिवसैनिक सेनेसोबतच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत (Elections) या गद्दारांना धडा शिकवावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करतानाच गद्दारांनी हिंमत असेल तर बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackray) फोटोशिवाय लढून दाखवावे, असे आव्हान संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी दिले. (Shivsena leader Sanjay Sawant given challange to traitors)

Shivsena leader Sanjay Sawant
अंधेरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपशी चर्चा करा ; सरनाईकांची मुख्यमंत्र्यांना विनंती

सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झाला, त्यात श्री. सावंत बोलत होते. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, अरविंद नाईक आदी उपस्थित होते.

Shivsena leader Sanjay Sawant
Balasaheb Thorat : शाळा बंदचे धोरण श्रीमंतधार्जिने

या वेळी मार्गदर्शन करताना श्री. सावंत म्हणाले, की येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पेटून उठत कामाला लागावे. आपल्याला मिळालेले मशाल चिन्ह घराघरात पोचवावे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांनी कसाही वाढवावा, पण आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, खोट्या गुन्ह्यात अडकवले तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही देत गद्दारांना पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावेत, असे आवाहन सावंत यांनी केले.

महिला आघाडीप्रमुख महानंदा पाटील, विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास गजानन मालपुरे, युवासेनाप्रमुख नीलेश चौधरी, पीयूष गांधी उपस्थित होते. प्रशांत सुरळकर यांनी सूत्रसंचालन केले. उमेश चौधरी यांनी आभार मानले. मेळाव्यास ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com