Pankaja Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde News: पंकजा मुंडे खरच राजकारण सोडतील का?

नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पंकडा मुंडे पात्रता असुनही मला संधी मिळाली नाही, असे म्हटले.

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pnakja Munde) या सबंध महाराष्ट्रभर (Maharashtra) जनाधार असलेल्या नेत्या आहेत. मात्र गेले काही दिवस त्या पक्षात नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी `पात्रता असुनही मला संधी मिळाली नाही` असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांची भविष्यातील वाटचाल काय असेल, याची उत्सुकता आहे. (Pankja Munde said, i have a capacity still unjustice with me)

(कै.) गोपीनाथ मुंडे यांना सबंध महाराष्ट्रात जनाधार होता. त्यांचा हाच वारसा भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढे सुरु ठेवला आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र साखर कारखाने, ऊसतोड कामगार यांसह त्यांना सबंध महाराष्ट्रभर सामाजिक जनाधार आहे. त्यामुळे च राजकारणात देखील त्यांचा दबदबा कायम आहे. त्यांच्यामागे असलेला जनाधार विचारात घेता पक्षाने त्यांना ज्या प्रकारे संधी मिळायला हवी होती, तशी मिळालेली नाही, ही त्यांच्या समर्थकांची खंत आहे.

शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स या समाजाच्या संस्थेतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यक्रम झाला. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, राजकारणामध्ये टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ असा नव्हे, की काहीतरी मिळवण्यासाठी कोणाकडे झुकावे. मला पात्रता असूनही संधी मिळाली नाही, त्यामुळे स्वाभिमानाने राजकारण सोडणे मी पसंत करेल.

पंकजा मुंडे यांच्या `स्वाभिमानाने राजकारण सोडेण` या वाक्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये देखील चलबिचल झाली. पंकजा मुंडे खरोखर राजकारण सोडण्याच्या मनस्थितीत आहेत का? अशीही अस्वस्थता आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीतील प्रश्नांना उत्तरे देताना मनमोकळी चर्चा केली. तरुणांना जीवनात हिमतीने आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. काही मिळवण्यासाठी कुणासमोरही वाकण्याची गरज नाही असा सल्ला देखील त्यांनी तरूणांना दिला. 

त्या म्हणाल्या, मला लिखाणाची आवड असून राजकारणाबरोबरच लेखक व्हायला आवडले असते. मला अनुभवाच्या मालिका व अनुभव लिहायचे आहे. राजकारणातील मॅनेजमेंट हे वेगळे असते. यापुढे महिलांना मॅनेजमेंट करताना पाहायला आवडेल. राजकीय व्यक्तीने जे बोलतो तेच केले तर लोकांचे वलय आपल्यापासून कोणीही हिरावू शकत नाही.

मुलाखतीनंतर पंकजा मुंडे यांच्या हस्ते वंजारी युवा सन्मान पुरस्काराचे वितरण झाले. अध्यक्षस्थानी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा माजी अध्यक्ष अॅड. आव्हाड म्हणाले, की असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स ही माणसं घडविण्याचे काम करत आहे. ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे ती त्यांच्या कार्याची पावती आहे. यातून तरुणांना प्रेरणा मिळेल. हेमंत धात्रक, उदय सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT