Machhindra Sanap & Mukesh Sanap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NMC NCP Politics: आता सुनिल तटकरेच घालणार नगरसेवक मुकेश शहाणेंना लगाम, महापालिका स्थायी सभापती उमेदवारीतून भाजपशी पुन्हा पंगा!

Sunil Tatkare to act against Mukesh Shahane in NMC: बिनविरोध निवडणूक करण्याच्या भाजपच्या मार्गात मुकेश शहाणे यांच्या अति उत्साहाने खोडा?

Sampat Devgire

Nashik Municipal Corporation standing committee controversy: महापालिका स्थायी समितीची निवडणूक उद्या होत आहे. भाजपने याबाबतीत सर्व फिल्डिंग टाईट केली आहे. त्यामुळे  भाजपचा सभापती बिनविरोध निवडून येण्याची चिन्हे आहेत. 

महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीमुळे भाजपने सामाजिक समतोल साधला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपचे सानप यांनी सभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केला.

मात्र भाजपच्या बिनविरोध सभापती निवडून आणण्याच्या प्रक्रियेत एक राजकीय बाधा आली आहे. भाजपला उठ सूट विरोध करण्याच्या धोरणाने मुकेश शहाणे चर्चेत आहेत. त्यांनी एकही सदस्य पाठीशी नसताना सभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

नगरसेवक शहाणे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सह सदस्य आहेत. अपक्ष असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समवेत गटन नोंदणी केली आहे. महापालिकेत पाच सदस्यांचा त्यांचा गट आहे.

या राजकारणाचा फायदा उठविण्याची खेळी शहाणे यांनी केली आहे. पक्षाची अधिकृत सूचना नसताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीत उमेदवारी करायची की माघारी घ्यायची याचा निर्णय काल रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार होत्या. मात्र शोकसभा लांबल्याने याबाबतचा निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही.

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना कळवला आहे. आज सकाळी प्रदेश अध्यक्ष तटकरे याबाबत निर्णय घेतील असे सूत्रांनी कळवले. महायुतीचा घटक पक्ष म्हणून शहाणे यांना माघारी घेण्याच्या सूचना येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे राजकीय अतिउत्साही पणा शहाणे यांची कोंडी करणारा करू शकतो.

स्थायी समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नऊ सदस्य आहेत. त्या खालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे चार सदस्य आहेत. त्यामुळे बहुमत असल्याने भाजपचे मच्छिंद्र सानप बिनविरोध सभापती होण्यात सध्या तरी कोणताही अडथळा नाही. राज्यात महायुती असल्याने तेच सूत्र महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने स्वीकारले आहे. त्यामुळे शहाणे निवडणुकीच्या माघार घेऊन "राजकीय शहाणे" ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT