Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : येवल्यात भुजबळांची ताकद दुप्पट; दोनदा विरोधात उभा राहिलेला नेता काकांसह राष्ट्रवादीत

Sambhaji-Pawar Join NCP : येवला नगरापालिका निवडणुकीत छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशात येवल्यातील मोठा नेता छगन भुजबळ यांच्यासोबत येत असल्याने येवल्यातील समीकरणे बदलणार आहेत.

Ganesh Sonawane

Yeola politics : ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात नाशिकच्या येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवलेला ठाकरे सेनेचा नेता भुजबळांच्याच गोटात दाखल होत असून राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.

येवला हा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. भुजबळांच्या विरोधात दोनदा विधानसभा निवडणुक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार हे आपले काका व माजी आमदार मारुती पवार यांच्यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. विशेष छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर पवार यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश सोहळा होणार आहे. आज दुपारी मुंबई येथे हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन संभाजी पवार समर्थक हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. संभाजी पवार यांच्या राष्ट्रवादीत आल्याने येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांची ताकद आणखी वाढणार आहे.

येवला नगरपालिका निवडणुकीत मंत्री भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भुजबळांना शह देण्यासाठी विधानसभेला भुजबळांविरोधात निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांनी शिवसेना(शिंदे) गटाचे आमदार किशोर दराडे यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. अशात संभाजी पवार काय भूमिका घेता याकडे येवले करांचे लक्ष लागून होते.

संभाजी पवार यांना गळाला लावण्यात मंत्री छगन भुजबळांना यश आलं आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत भुजबळांच्या उमेदवाराला त्याचा मोठा फायदा होणार आहे. संभाजी पवार यांच्यासोबत माजी आमदार मारोतराव पवार, युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख बापू गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी नेते प्रवीण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे, विद्यमान संचालक कांतीलाल साळवे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT