Youth Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Youth Congress : मोदी सरकारच्या रथाला युवक काँग्रेसकडून काळे झेंडे ; श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण तापले!

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News: लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा राजकीय संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. लोकसभा २०२४च्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप-काॅंग्रेस संघर्ष दिसणार आहे. त्याची अनुभूती आताच येऊ लागली आहे.

मोदी सरकारच्या 'आपला संकल्प विकसित भारत' या नावाने फिरणाऱ्या रथाला युवक काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीगोंद्यातील मढेवडगाव येथे काळे झेंडे दाखवले. श्रीगोंदा तालुक्यात भाजपचा आमदार आहे. यातच युवक काॅंग्रेस(Congress) कार्यकर्त्यांनी ही कृतीमुळे श्रीगोंदा येथील राजकीय वातावरण तापले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपला संकल्प विकसित भारत या नावाने 'मोदी सरकार'कडून देशभर रथ फिरवला जात आहे. नगर जिल्ह्यात देखील हा रथ फिरवला जात आहे. श्रीगोंदे तालुक्यातील मढेवडगाव येथे हा रथ आला असताना युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले. रथावरील 'मोदी सरकार'ची हमी या वाक्यास युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

'मोदी सरकार'ची हमी हे नाव खोडून तिथे 'भारत सरकार' हे नाव रथावर टाकले. रथाबरोबर काही अधिकारी होते. कार्यकर्त्यांनी त्यांना देखील धारेवर धरले. मोदी सरकारचा निषेधाच्या घोषणा यावेळी दिल्या.

''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी व तरुणांना अनेक प्रलोभने दाखवले. बेरोजगार युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार, नोकरी उपलब्ध करुन देण्याची हमी दिली. महागाई कमी करण्यासारखे अनेक आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी दिलेले होते. मात्र कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. यामुळे युवकांमध्ये असंतोष आहे.'' असं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.

याशिवाय कांदा निर्यातीवर घातलेली बंदी, पिकांची न भेटलेली नुकसान भरपाई या कारणाने शेतकरीही मोदींच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. श्रीगोंदे तालुक्यात फिरत असलेल्या रथावर टाकलेले 'मोदी सरकार'ची हमी असे नावही त्यात कळीचा मुद्दा ठरला आहे.

जनता अधिकाऱ्यांना सरकार मोदींचे आहे की भारताचे हा प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच राहुल साळवे, हनुमंत झिटे,अक्षय ससाणे, अभिजित शिंदे, राजेंद्र उंडे, लालासाहेब गोरे यावेळी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT