Parliament Winter Session : मोदी-शाह मीडियाला मुलाखती देतात, पण संसदेत येईनात!

Lok Sabha Winter Session : मल्लिकार्जुन खर्गे यांचे टीकास्त्र...
Narendra Modi : Amit Shah
Narendra Modi : Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Security Breach : लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांनी रान उठवले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. सभागृहातील गदारोळावरून आतापर्यंत लोकसभेतील एकूण 46 खासदाराना निलंबित करण्यात आले आहे. त्यावरून आता विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभेत (Lok Sabha) सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गदारोळ घातला. त्यानंतर 33 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्याआधी 13 खासदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षातील इतर खासदारांकडूनही सरकारला धारेवर धरले जात आहे.

Narendra Modi : Amit Shah
Lok Sabha Winter Session : 'इंडिया'ला मोठा धक्का; अधीर रंजन चौधरींसह लोकसभेचे 33 खासदार निलंबित

खर्गे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, 'पंतप्रधान वृत्तपत्राला मुलाखत देतात, गृहमंत्री टीव्ही चॅनेलवर मुलाखती देतात. पण भारतीय नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेप्रती त्यांचे शून्य उत्तरदायित्व आहे. आता विरोधकांशिवाय मोदी सरकारकडून कोणत्याही चर्चेविना प्रलंबित विधेयके मंजूर केली जातील.' पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देत घुसखोरीवर भाष्य केले आहे. तर अमित शाह यांनीही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात यावर भूमिका मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधी संसदेत घुसखोरी झाली. नंतर मोदी सरकारकडून संसद आणि लोकशाहीवर हल्ला करण्यात आला. मोदी सरकारने खासदारांना निलंबित करून लोकशाहीची सर्व मूल्ये कचरापेटीत टाकली आहेत. आमच्या केवळ दोनच मागण्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी घुसखोरीच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात निवेदन द्यावे आणि यावर सविस्तर चर्चा करावी, या आमच्या मागण्या आहेत, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोमवारी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, डीएमकेचे टी.आर. बालू, दयानिधी मारन, तृणमूलच्या सौगत रॉय यांचा समावेश आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. अखेर गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

(Edited By - Rajanand More)

Narendra Modi : Amit Shah
Lok Sabha Security Breach : दिल्ली पोलिसांचा महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये तळ; 50 टीमकडून तपास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com