Prakash Ambedkar VBA Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : थेट प्रकाश आंबेडकरांना फोन करत असाल तर थांबा..! ‘वंचित’ची महत्वाची सूचना

Vanchit Bahujan Aaghadi Siddharth Mokle : वंचितचे मुख्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांना सूचना दिल्या आहेत.

Rajanand More

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना थेट फोन संपर्क साधणे आता शक्य होईलच असे नाही. त्यांच्याशी फोनवर बोलण्याबाबत आघाडीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

आघाडीचे मुख्य प्रवक्ते व प्रदेशा उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी अनेक जण काहीही आवश्यकता नसताना, काम नसतांना फोनवर संपर्क साधत असल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे.

अशा पद्धतीच्या कॉलमुळे काहीही साध्य होत नाही, मात्र महत्वाच्या कामात, बैठकीत, व्यत्यय निर्माण होत असल्याचे सांगत मोकळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे थेट आंबेडकरांशी फोन न करण्याची महत्वाची सूचना मोकळे यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

ज्यांना कोणाला नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलायचे असेल त्यांनी स्थानिक तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत संपर्क साधावा, असे मोकळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे थेट आंबेडकरांना फोन करताना कार्यकर्ते व समर्थकांवर बंधने आल्याची चर्चा आहे.

वंचित सोशल मीडिया स्टाँग करणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून सोशल मीडिया टीम स्टाँग केली जाणार आहे. या टीममध्ये येण्यासाठी खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे. टीममध्ये येऊन महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा वाचवा, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचितकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जाऊ शकतो.

बहुतेक निवडणुकांमध्ये आता सर्वच पक्ष, उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तसेच चित्र पाहायला मिळाले. आता त्यामध्ये वंचितही मागे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT