Muslim Reservation : मराठ्यानंतर मुस्लिमही आरक्षणासाठी सरसावले; मनोज जरांगेंना साद

Rajendra Jagtap Appeal Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंबाजोगाईतील जाहीर सभेत मुस्लिम आरक्षण देता येणार नाही असे वक्तव्य केले होते.
Manoj Jarange, Rajendra Jagtap
Manoj Jarange, Rajendra JagtapSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे यांनी न भूतो ना भविष्यती असा लढा उभारत महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण खऱ्या अर्थानं ढवळून काढले आहे. त्याांच्या संघर्षामुळे असंख्य मराठा युवकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. मराठा आरक्षण प्रश्न धसास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता राज्यातील मुस्लिम समाजाला सुध्दा शिक्षण आणि नोकरीत आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा द्यावा, अशी साद माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी जरांगेंना घातली आहे.

आपण स्वतः माजी आमदार सिराज देशमुख, माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर यांनी पुढाकार घेत 2012 मध्ये छत्रपती संभाजीनगरला दिवंगत विनायकराव मेटे Vinayak Mete यांच्या अध्यक्षतेखालम मुस्लिम आरक्षणाचा मेळावा घेतला होता. सदर प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पटवून दिला होता.

या सर्व पाठपुराव्यामुळे शासनाने माजी मंत्री नारायण राणे Narayan Rane यांच्या अध्यक्षतेखाली मराठा - मुस्लिम आरक्षण समिती स्थापन केली होती. समितीने मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला अनुक्रमे पाच टक्के आरक्षण मंजूर केले होते, याची आठवणही जगताप यांनी करुन दिली. आता मुस्लिम बांधवाना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांनी लक्ष घालावे, असा आग्रह राजेंद्र जगताप यांनी केला.

Manoj Jarange, Rajendra Jagtap
Jayant Patil On BJP : सरकारमधील आमदाराचा 'प्रताप'! चक्क मृतांवरच उपचार; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

दरम्यान, भाजप मुस्लिम आरक्षण विरोधक असल्याचा गंभीर आरोप करत तत्कालिन मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण सरकारने दिलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले होते. तर, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंबाजोगाईतील जाहीर सभेत मुस्लिम आरक्षण देता येणार नाही असे वक्तव्य केले होते.

राजेंद्र जगताप Rajendra Jagtap यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत समाजातील एकालाही उमेदवारी दिली नसल्याने लक्षही जगतापांनी वेधले. तसेच भविष्यात तरी संधी द्यावी, असे सुतोवाचही राजेंद्र जगताप यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange, Rajendra Jagtap
Aaditya Thackeray News : वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरण म्हणजे खून; मुख्यमंत्री बोलत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांना निबंध..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com