Ambedkar_Athawale 
महाराष्ट्र

Sujat Ambedkar: ...तर रामदास आठवलेंशी युती होऊ शकते! सुजात आंबेडकरांच्या 'त्या' विधानानंतर आठवले काय घेणार निर्णय?

Sujat Ambedkar: राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. अद्याप या निवडणुकांची घोषणा झालेली नसली तरी त्यादृष्टीनं तयारीला आणि मोर्चेबांधणीला विविध राजकीय पक्षांकडून सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare

Sujat Ambedkar: राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. अद्याप या निवडणुकांची घोषणा झालेली नसली तरी त्यादृष्टीनं तयारीला आणि मोर्चेबांधणीला विविध राजकीय पक्षांकडून सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर युत्या-आघाड्या किंवा स्वबळाचे नारे दिले जात आहेत.

यापार्श्वभूमीवर मिनी विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी आंबेडकरी पक्षांमध्येही हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तर दुसरीकडं रिपब्लिक पार्टीचे नेते रामदास आठवले आणि इतर गटांचे नेते आपल्या शक्यता तपासून पाहात आहेत. त्यातच पुन्हा एकदा आठवलेंशी जुळवून घेण्याबाबत किंवा युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे पुत्र आणि वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं पुन्हा एकदा आंबेडकरी पक्षांच्या एकीकरणाचा मुद्दा पुढे आला आहे.

सुजात आंबेडकर यांनी नुकतेच काही माध्यम प्रतिनिधींशी आठवलेंसोबतच्या मुद्दयावर बोलतं केलं. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले, "भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून कोणाशीही युती करु शकतो तसंच महाविकास आघाडी मधला जो पक्ष भाजपबरोबर आहे, त्या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही" तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीच्या विषयावरही सुजात आंबेडकर यांनी आज स्पष्टीकरण दिलं. "वंचित बहुजन आघाडीमध्ये उमेदवार निवडताना स्थानिक आणि राज्य कमिटीची चर्चा होऊन मगच तो निवडला जातो. आम्ही मागासलेल्या समाजातील नागरिकांना उमेदवारी दिली होती," असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कुठल्याही अपेक्षेविना एकत्र येण्यासाठी आठवले वारंवार प्रकाश आंबेडकर यांना साद घालत आहेत. त्यातच आता भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून कोणाशीही युती करु शकतो, असं विधान सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळं जर रामदास आठवलेंनी भाजपची साथ सोडली तर आंबेडकर आणि आठवले कुटुंबांचं मनोमिलन होऊ शकतं. पण त्यासाठी आठवले खरंच एनडीएतून बाहेर पडून भाजपची साथ सोडतील का? हे पाहावं लागेल.

पण प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वीपासूनच रामदास आठवले यांच्या राजकारणाला आणि तात्विक भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. आठवलेंनी कितीही प्रस्ताव पाठवले तरीही ते याकडं दुर्लक्ष करत आले आहेत. त्यामुळं जरी आठवलेंनी भाजपची साथ सोडली आणि वंचित सोबत येण्यासाठी तयार झाले तरी प्रकाश आंबेडकर त्याला किती प्रतिसाद देतात हा प्रश्नच आहे. पण तरीही राजकारणात काहीही होऊ शकतं या न्यायानं भविष्यात आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणाला वेगळं वळण देण्यासाठी किंवा ते अधिक मजबूत करण्याच्या व्यापक हेतून सर्व गटतट एकत्र येऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT