Arun Dengale: अरुण डोंगळे केवळ गोकुळसाठीच राजकीय पटलावर? महायुतीत शह-काटशहचं राजकारण

Arun Dengale: सर्वांच्याच व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या डोंगळे यांचा राजकीय शत्रू कोण? असा सवाल विचारण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.
Gokul
Gokul
Published on
Updated on

गोकुळचा अध्यक्ष झाल्यापासून ते राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्वांच्याच व्यासपीठावर फिरणारे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी नुकताच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि गोकुळ दूध संघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डोंगळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला खरा. मात्र सर्वांच्याच व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या डोंगळे यांचा राजकीय शत्रू कोण? असा सवाल विचारण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.

Gokul
Manoj Jarange Patil Video : 'ओबीसी नेत्यांना धडा शिकवणार, मराठे लक्ष ठेऊन...', मनोज जरांगेंचा थेट इशारा दिला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम केल्यानंतर गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजकीय आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. काही काळासाठी डोंगळे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा देखील जोरात सुरू होती. मात्र, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सर्व घडामोडींना ब्रेक मिळाला आणि त्यानंतर डोंगळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला.

Gokul
BJP Politics : पडळकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी नगरसेवकाने चंद्रकांत पाटलांसमोरच...

पक्षप्रवेश या वेळेच्या भाषणात मी साधा माणूस नव्हे, हत्तीला खाली बसून वर उठवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. गोकुळ दूध संघामध्ये तीस वर्षे सत्ता असलेल्या नेत्यांची सत्ता परिवर्तन केली. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही एकदा भूमिका घेतली की डोंगळे जिल्ह्यात नव्हे राज्यात सोडत नाहीत. गोकुळमध्ये राष्ट्रवादीमय करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असे स्पष्ट करत असताना डोंगळे यांचा विरोधक कोण? असा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Gokul
Vaibhav Khedekar : दोनवेळा प्रवेश हुकला; बडतर्फ मनसे नेत्याचा भाजप प्रवेश बड्या राजकीय नेत्यामुळे रखडला

एकीकडं विधानसभा निवडणुकीतील परिस्थितीत पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश अबिटकर यांना निवडणुकीत मदत केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत मागच्या वेळी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राहिले आहेत. आता राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून अध्यक्ष निवडीत झालेल्या राजीनामा नाट्यबदलचा मंत्री मुश्रीफ यांच्याबद्दलचा रोष कमी करून घेतला आहे. शिवाय महायुती म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि गोकुळच्या निवडणुकीत महाडिक यांच्या खांद्याला खांदा लावून लढावे लागणार आहे.

Gokul
Chhagan Bhujbal : बीडमधील ओबीसींचा महाएल्गार मेळावा रद्द, भुजबळांनी नम्रपणे सांगितलं कारण काय ते..

मात्र, एकंदरीतच वास्तविक राजकीय संदर्भ पाहता गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळे यांच्याकडे ठराव धारकांची संख्या अधिक आहे. मागील निवडणुकीत सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची एकत्र गट्टी पाहता यंदाची निवडणूक महायुती म्हणून लढावे लागेल. त्यामुळे सहाजिकच पाटील आणि मुश्रीफ हे एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. शिवाय दुसरीकडे गोकुळच्या राजकारणात महाडिक मुश्रीफ हे एकत्र असू शकतात. पण महायुतीतील काही नेत्यांकडून वरिष्ठ स्तरांवरून थेट मुश्रीफ यांच्यावर दबाव सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची बाजू भक्कम करण्यासाठी नुकतेच करवीर मधून राहुल पाटील राजेश पाटील यांना पक्षात घेतले. त्या पाठोपाठ अरुण डोंगळे यांना देखील पक्षात घेऊन गोकुळ मधील राष्ट्रवादीचा पाया भक्कम केला आहे. कारण के पी पाटील यांच्यासोबत डोंगळे यांनी देखील पक्षप्रवेश केल्याने गोकुळचे ठराव हे मुश्रीफ यांनाच द्यावे लागणार आहेत. शिवाय कागलचे रणजीत पाटील हे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

Gokul
Telangana Local Body Elections: अखेर आदेश निघाला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासर्गीयांना 42 टक्के आरक्षण

या सर्व गोष्टीचा विचार केला तर मुश्रीफ यांनी थेट अबिटकर आणि महाडिक यांनाच रोखण्याचा प्रकार आहे. गोकुळच्या मागील निवडणुकीत डोंगळे यांना मुश्रीफ यांनी सोबत घेतले. मात्र मागील पाच वर्षाचा कालावधी पाहता डोंगळे हे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या जवळीक दिसले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ते देखील दिसले आहेत. मात्र गोकुळ मधील राजकारण पाहता सहकारातील अनुभवी आणि डावपेचा तर्फेच असलेले मंत्री मुश्रीफ यांच्याकडेच जाण्याची पसंती डोंगळे यांनी दिली आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून विजयी झाल्यास गोकुळ मधील पदाची झोळी आपल्याकडे घेण्याची देखील ही खेळी असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Gokul
Sonam Wangchuk Arrest : लडाखमध्ये मोठी घडामोड : तरूणाईने 2 दिवसांपूर्वी भाजपचं कार्यालय पेटवलं; आज सोनम वांगचुक यांना अटक

तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीला पुत्र अभिषेक डोंगळे हे देखील राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. गोकुळच्या राजीनामा नाट्यानंतर डोंगळे यांनी थेट मुश्रीफ यांच्याकडे शब्द घेऊन राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. अगोदर जिल्हा परिषद निवडणूक मगच गोकुळची निवडणूक होणार असल्याने डोंगळे यांनी आपल्या मुलाचा उमेदवारीचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. तर दुसरीकडे गोकुळ दूध संघामध्ये राष्ट्रवादीमध्ये वातावरण करण्याच्या वक्तव्याने त्यांनी थेट पुन्हा एकदा महाडिक यांनाच आव्हान दिल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com